IB Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IB recruitment 2022
IB Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

IB Recruitment: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसरच्या (ACIO) 150 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या रिक्त पदांशी संबंधित जाहिरात IB ने काल म्हणजेच 16 एप्रिल 2022 रोजी जारी केली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावे लागतील. इंटेलिजन्स ब्युरो या भरती अंतर्गत ग्रेड-2/टेक्निकल अंतर्गत ACIO पदांची भरती करणार आहे. यामध्ये कंप्युटर सायन्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील 56 पदे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन स्ट्रीम मधील 94 पदे रिक्त आहेत, जी इंटलिजन्स ब्युरो या भरतीअंतर्गत भरणार आहे. (Intelligence Bureau invited applications for the Assistant Central Intelligence Officer vacancies)

महत्वाच्या तारखा-

1. अर्ज प्रक्रियेची सुरुवातीची तारीख - 16 एप्रिल 2022

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 मे 2022

हेही वाचा: 12वी पास अन् पदवीधरांना Railway मध्ये काम करण्याची संधी! असा करा अर्ज

पात्रता-

या पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही तांत्रिक शिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये BE किंवा B.Tech पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटरसह भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)असणे आवश्यक आहे. कंप्युटर अ‍ॅप्लिकेशन मध्ये पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. यासोबतच उमेदवाराला संबंधित विषयातील 2020, 2021 किंवा 2022 ची GATE परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा-

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 7 मे 2022 रोजी 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.

हेही वाचा: BSF मध्ये मेगा भरती! निवड प्रक्रिया अन् अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या

शुल्क-

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तथापि, उमेदवार SBI चलनाद्वारेदेखील अर्ज शुल्क भरू शकतात.

असा अर्ज करा-

असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना गृह मंत्रालयाच्या www.mha.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. उमेदवार तेथे दिलेल्या ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. उमेदवार नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलच्या, ncs.gov.in वेबसाइटला भेट देऊन देखील अर्ज करू शकतात.

Web Title: Intelligence Bureau Invited Applications For The Assistant Central Intelligence Officer Vacancies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top