esakal | Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Jobs_IB

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी, असा सल्ला देण्यात येत आहे.

Govt Jobs: गुप्तचर विभागात मोठी भरती; गृह मंत्रालयाने मागविले अर्ज

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

IB Recruitment 2020: नवी दिल्ली : देशातील प्रमुख संस्थापैकी एक असलेल्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभागात काम करण्याची आणि याद्वारे देशसेवा करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (SIO) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. एकूण २ हजार रिक्त पदांवर ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी गृह मंत्रालयाच्या https://www.mha.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी निश्चित करण्यात आली आहे.

- CDS II Result 2020: यूपीएससीनं जाहीर केला निकाल, येथे पाहा निकाल!

पात्रता -
अर्ज करण्यासाठी उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

वय - 
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्षे निश्चित केले आहे. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.

अर्जासाठी शुल्क - 
जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्ग - ६०० रुपये
इतर राखीव वर्ग - ५०० रुपये

वेतन - 
४४,९०० ते १,४२,४०० रुपये 

UPSC Recruitment 2020: यूपीएससीने विविध विभागात काढली भरती; असे करा अर्ज​

निवड प्रक्रिया - 
उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणीद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतर मुलाखत घेण्यात येईल. मुलाखतीवेळी उमेदवारांना साइकोमेट्रिक/ अॅप्टीट्यूड टेस्ट द्यावी लागेल, जो मुलाखतीचाच एक भाग आहे. 

निवड झालेल्या उमेदवारांना विशेष सुरक्षा भत्ताही देण्यात येईल, जो इतर सरकारी भत्ते वगळता मूळ वेतनाच्या २० टक्के असेल. देशभरात कुठेही सेवा करण्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात. या पोस्टसाठी ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटीचा समावेश करण्यात आला आहे. 

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचावी, असा सल्ला देण्यात येत आहे. यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रतेसह इतर सर्व माहिती तपशीलवार मिळेल. 

UPSC CSE 2020: मुख्य परीक्षेचं अॅडमिट कार्ड करा डाऊनलोड; वाचा सविस्तर​

अर्ज करण्याची अंतिम तारीख - ९ जानेवारी

IB SIO 2020 भरती आणि परीक्षेसंबंधी इतर तपशील पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अर्ज करण्यासाठी थेट लिंकसाठी येथे ► क्लिक करा 

- एज्युकेशन-जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By: Ashish N. Kadam)

भारत दिल्ली गृह मंत्रालय

loading image
go to top