JEE ॲडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्‍टोबरला - शिक्षणमंत्री

jee advance
jee advanceesakal

नाशिक : आयआयटी व तत्सम राष्ट्रीय स्‍तरावरील संस्‍थांमध्ये प्रवेशासाठी जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षा येत्‍या ३ ऑक्‍टोबरला घेतली जाईल. या संदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली. जेईई मेन्‍स परीक्षेतून पात्रता मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षेला प्रविष्ट होता येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया स्‍वतंत्ररीत्‍या राबविली जाईल. यापूर्वी ३ जुलैला जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षा नियोजित होती; परंतु कोरोना महामारीमुळे एप्रिल व मे महिन्‍यातील जेईई मेन्‍स परीक्षेपाठोपाठ जेईई ॲडव्हान्स्‍ड परीक्षादेखील पुढे ढकलली होती. यंदा आयआयटी खरगपूरतर्फे या परीक्षेचे संयोजन केले जात आहे. केंद्रीय मंत्री प्रधान यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर जारी दिशानिर्देशांचे पालन करत देशभरातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. (JEE-advanced-exam-on-October-3-marathi-news-jpd93)

जेईई मेन्‍स परीक्षेचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर जेईई ॲडव्हान्स्‍डकरिता नोंदणीची प्रक्रिया राबविली जाईल. अद्ययावत माहिती संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. त्‍यामुळे विद्यार्थी व पालकांनी नियमितपणे संकेतस्‍थळाला भेट द्यावी, असे आवाहनही आयोजक संस्‍थेने केले आहे. दरम्‍यान, सोमवारी (ता. २६) जेईई ॲडव्हान्स्‍डकरिताचे संकेतस्‍थळ ठप्प झालेले होते.

jee advance
दारणासह नांदूरमध्यमेश्‍वर, भावलीतून विसर्ग सुरू
jee advance
नाशिककरांचे हक्काचे 400 दशलक्ष घनफूट पाणी वाया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com