esakal | JEE Main परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर; 'असा' पाहा Result I National Testing Agency
sakal

बोलून बातमी शोधा

JEE Main 2021

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा पेपर 2 चा निकाल आज जाहीर केलाय.

JEE Main परीक्षेच्या पेपर दोनचा निकाल जाहीर; 'असा' पाहा Result

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE Main 2021) पेपर 2 चा निकाल आज 5 ऑक्टोबर रोजी jeemain.nta.nic.in वर जाहीर केलाय. दरम्यान, निकालात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज फॉर्म क्रमांक आणि जन्मतारीख भरणं आवश्यक आहे. जवळपास 60000 विद्यार्थ्यांसाठी JEE मेन BArch आणि BPlanning चे निकाल घोषित केले, तर एनटीएकडून B Tech चे निकाल आधीच जाहीर करण्यात आले आहेत.

हेही वाचा: SBI मध्ये ऑफिसर पदांसाठी बंपर भरती; बॅंक भरणार 2 हजारहून अधिक जागा

असा तपासा JEE मेनचा 'निकाल'

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर jeemain.nta.nic.in जा.

  • त्यानंतर मुख्यपेजवर 'JEE मेन 2021 पेपर 2 निकाल' या लिंकवर क्लिक करा.

  • आता स्क्रीनवर नवीन लॉगिन विंडो दिसेल

  • त्यामध्ये अॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सेक्युरिटी पीन टाका

  • 'सबमिट' या ऑप्शनवर क्लिक करा

  • JEE मेन निकाल 2021 पेपर 2 आपल्या स्क्रिनवर दिसेल

  • निकाल चेक करा आणि डाऊनलोड करा.

हेही वाचा: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; दहावी पास उमेदवारांनाही करता येणार अर्ज

loading image
go to top