esakal | SBI मध्ये ऑफिसर पदांसाठी बंपर भरती; बॅंक भरणार 2 हजारहून अधिक जागा I SBI Bank
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Bank

स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) पदासाठी नुकतीच अधिसूचना जारी केलीय.

SBI मध्ये ऑफिसर पदांसाठी बंपर भरती; बॅंक भरणार 2 हजारहून अधिक जागा

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

SBI PO Notification 2021, Sarkari Naukri 2021 : ​​सध्या देशभरात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक जागांसाठी भरती चालू आहे. आता स्टेट बँकने (SBI) प्रोबेशनरी ऑफिसर (Probationary Officer) पदासाठी नुकतीच अधिसूचना जारी केलीय. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आज 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, तर 25 ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. दरम्यान, इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला sbi.co.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे अधिकाऱ्यांच्या एकूण 2056 जागा भरल्या जाणार आहेत.

हेही वाचा: CIPET मध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीतून होणार निवड

SBI PO भरतीसाठी पूर्व परीक्षा नोव्हेंबर/डिसेंबरमध्ये घेतली जाईल, तर यात एकूण 2,056 जागांपैकी 200 जागा ईडब्ल्यूएस (EWS) श्रेणीच्या उमेदवारांसाठी राखीव असतील. परिविक्षाधीन अधिकारी पदावर नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत फेरी आणि पूर्व परीक्षा प्रशिक्षणमध्ये पास व्हावे लागणार आहे. या निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती अधिसूचनेमध्ये उपलब्ध करण्यात आलीय.

हेही वाचा: NEET-UG 2021 रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

या पदाकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे पदवी असणं आवश्यक आहे. शिवाय, जे उमेदवार पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टरमध्ये शिकत आहेत, असे उमेदवार 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करु शकतात. या अटीच्या अधीन राहून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी वयोमर्यादा 21 वर्षे ते 30 वर्षे ठेवण्यात आलीय, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना यात सूट देण्यात आलीय.

हेही वाचा: रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; दहावी पास उमेदवारांनाही करता येणार अर्ज

निवड झालेल्या उमेदवारांना वेतनवाढीसह 27,620 रुपयांच्या मूळ वेतनावर नियुक्त केलं जाईल. शिवाय, निवडलेल्या उमेदवारांचे वेतन 23,700 ते 42,020 रुपयांपर्यंत असेल. तसेच उमेदवार डीए, एचआरडी, सीसीए (DA, HRD, CCA) आणि इतर भत्ते मिळण्यास पात्र असतील. निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाख रुपयांच्या बॉण्डवर स्वाक्षरीही करावी लागणार असून बाँडनुसार, उमेदवारांना किमान तीन वर्षांच्या कालावधीसाठी बँकेत सेवा द्यावी लागणार आहे.

loading image
go to top