रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; दहावी पास उमेदवारांनाही करता येणार अर्ज

Railway Recruitment 2021
Railway Recruitment 2021esakal
Summary

रेल्वे भरती सेलने (RRC) अप्रेंटिस पदासाठी नुकतीच अधिसूचना जारी केलीय.

RRC Railway Recruitment 2021 : रेल्वे भरती सेलने (RRC) अप्रेंटिस पदासाठी नुकतीच अधिसूचना जारी केलीय. जर तुम्ही रेल्वे भरतीची तयारी करत असाल, तर तुम्ही या रिक्त पदासाठी अर्ज करू शकता. RRC भरतीच्या अधिसूचनेनुसार, रेल्वेत 2000 पेक्षा जास्त ट्रेड अप्रेंटिस पदे भरली जाणार असून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया 4 ऑक्टोबरपासून सुरू झालीय.

दरम्यान, इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर rrcer.com जावून रेल्वेसाठी (Eastern Railway Recruitment 2021) ऑनलाइन अर्ज भरू शकतात. ही अर्ज प्रक्रिया 3 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील, तर निवडलेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2021 रोजी रेल्वे भरती सेलद्वारे जाहीर करण्यात येईल. तसेच उमेदवारांची अंतिम निवड कागदपत्र पडताळणी फेरीनंतरच केली जाईल.

रिक्त जागा

हावडा- 659

सियालदह - 1123

आसनसोल - 167

मालदा- 43

कांचरापारा- 190

लिलुआ- 85

जमालपूर - 678

एकूण रिक्त पदे - 2945

Railway Recruitment 2021
CIPET मध्ये नोकरीची संधी; थेट मुलाखतीतून होणार निवड

शैक्षणिक पात्रता : रेल्वे अॅप्रेंटिस भरतीसाठी (Railway Apprentice Recruitment 2021) अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 50 टक्के गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. याव्यतिरिक्त प्रशिक्षणार्थी कायदा 1961 आणि प्रशिक्षणार्थी नियम 1992 अंतर्गत प्रशिक्षित होण्यासाठी उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणंही आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा जास्तीत-जास्त 15 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 24 वर्षे असावी.

अर्ज फी : सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना शासकीय निकषांनुसार फीमधून सूट देण्यात आलीय.

Railway Recruitment 2021
NEET-UG 2021 रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com