esakal | JEE मेन परीक्षेचा निकाल लांबणार; 'NTA'कडून वेळापत्रकात बदल
sakal

बोलून बातमी शोधा

Jee Main

जेईई मुख्य परीक्षेच्या निकालास उशीर झाला असून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आलीय.

JEE मेन परीक्षेचा निकाल लांबणार; 'NTA'कडून वेळापत्रकात बदल

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

JEE Main 2021 Result : जेईई मुख्य परीक्षेच्या निकालास उशीर झाला असून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आलीय. आयआयटी खरगपूरने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ११ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होणार होती. पण, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून सत्र -४ साठी जेईई मेनच्या निकालास उशीर झाल्यामुळे संस्थेने वेळापत्रकही बदलले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी नोंदणी आजपासून सुरू होण्याऐवजी आता 13 सप्टेंबरपासून सुरू होईल.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी खडगपूरने जेईई अॅडव्हान्सचे वेळापत्रक बदल्याने नोंदणीची प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन ती 19 सप्टेंबरपर्यंत चालू राहील. यासाठी अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर असणार आहे. दरम्यान, जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले व अडीच लाखांत आलेले उमेदवार या परीक्षेसाठी नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी Jeeadv.ac.in जेईईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. दरम्यान, या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनी jeemain.nta.nic.in या वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता.

उमेदवारांसाठी प्रवेशपत्र 25 सप्टेंबर रोजी उपलब्ध होणार असून जेईई अॅडव्हान्स परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येईल. परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाणार असून पहिले सत्र पेपर I साठी असेल, जी सकाळी 9 ते दुपारी 12 पर्यंत चालेल. तसेच दुसऱ्या सत्रात पेपर II दुपारी 2.30 ते 5.30 या वेळेत घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: बँक, रुग्णालय, रेल्वेसह अनेक विभागांत सरकारी नोकरीची संधी

JEE Advanced 2021 साठी नोंदणी कशी करावी?

 • स्टेज 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला jeeadv.ac.in भेट द्या.

 • स्टेज 2 : त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.

 • स्टेज 3 : आता नवीन नोंदणीच्या दुव्यावर क्लिक करा.

 • स्टेज 4 : यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.

 • स्टेज 5 : आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा. तद्नंतर फोटो अपलोड करुन स्वाक्षरीही करा.

 • स्टेज 6 : सर्व भरुन झाल्यावर अर्ज फी सबमिट करा.

 • स्टेज 7 : शेवटी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंटही घ्या.

हेही वाचा: 10 वी, 12 वीसह पदवीधरांना भेल, गेल, सेलमध्ये नोकरीची संधी

JEE Main 2021 Session 4 Result कसा पहायचा?

 • स्टेज 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर jeemain.nta.nic.in जा.

 • स्टेज 2 : वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

 • स्टेज 3 : आता अर्ज भरण्यासाठी संकेतशब्द व जन्मतारीख या पर्यायावर क्लिक करा.

 • स्टेज 4 : त्यानंतर अर्ज क्रमांक, पासवर्ड किंवा जन्मतारखेच्या मदतीने लॉगिन करा.

 • स्टेज 5 : तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

 • स्टेज 6 : तो आता तपासा.

 • स्टेज 7 : भविष्यातील संदर्भासाठी निकालाचीही प्रिंट काढून घ्या.

loading image
go to top