esakal | 10 वी, 12 वीसह पदवीधरांना भेल, गेल, सेलमध्ये नोकरीची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Job

देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती निघालीय.

10 वी, 12 वीसह पदवीधरांना भेल, गेल, सेलमध्ये नोकरीची संधी

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Sarkari Jobs : देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये विविध पदांसाठी भरती निघालीय. यामध्ये भेल, गेल आणि सेल या सारख्या कंपन्यांत 10 वी, 12 वी पास विद्यार्थ्यांसह बीटेक आणि एमटेकच्या विद्यार्थ्यांनाही नोकरीची संधी मिळणार आहे. चांगल्या पगारासाठी इच्छुक असलेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. ऑईल इंडिया लिमिटेडमध्ये ग्रेड III च्या पदांवर 535 जागा रिक्त आहेत. या पदांकरिता आयटीआयचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. तसेच भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड अर्थात भेलमध्ये अभियंता आणि पर्यवेक्षकांची भरती निघालीय. याशिवाय, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने DEO, नर्स, मेडिकल लॅब टेक्निशियनच्या पदांसाठी भरती काढलीय.

'भारत लिमिटेड'मध्ये अभियंता पदासाठी भरती

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने (BHEL) अभियंता आणि पर्यवेक्षकांच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त असलेले तरुण अभियंता व पर्यवेक्षक पदासाठी अर्ज करू शकतात. यासाठी 24 सप्टेंबरपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येईल. कंपनीच्या अधिसूचनेनुसार, अभियंता आणि पर्यवेक्षकांच्या एकूण 22 जागा आहेत. त्यापैकी सात रिक्त जागा अभियंता पदासाठी, तर 15 पदे पर्यवेक्षक पदासाठी आहेत.

हेही वाचा: भारतीय नौदलात 'अधिकारी' होण्याची सुवर्ण संधी

'ऑईल इंडिया'त 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी

ऑईल इंडिया लिमिटेडने ग्रेड III पदांसाठी नुकतेच अर्ज मागविले असून या पदाकरिता किमान 10 वी, 12 वीसह आयटीआयचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला ऑईल इंडियाच्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2021 आहे. डिब्रुगढ, तिनसुखिया, सिवासनगर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या चांगलांग जिल्ह्यातील पदांसाठी ऑईल इंडियाने ही भरती काढलीय. या अंतर्गत एकूण 535 रिक्त जागा भरणार आहेत.

हेही वाचा: बँक, रुग्णालय, रेल्वेसह अनेक विभागांत सरकारी नोकरीची संधी

SAIL मध्ये नर्ससह अनेक पदांवर नोकरीची संधी

स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये (सेल) नोकरीची संधी उपलब्ध झालीय. सेलने DEO, नर्स, मेडिकल लॅब टेक्निशियनसह विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना नुकतीच जारी केलीय. इच्छुक उमेदवार, सेलच्या अधिकृत वेबसाइटला sail.co.in भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांची भरती वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे केली जाईल. मुलाखत 20 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन घेतली जाईल. अधिसूचनेनुसार, अॅडव्हान्स स्पेशलाइज्ड नर्सिंग, डेटा एंट्री ऑपरेटर/ मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, मेडिकल लॅब/ टेक्निशियन, हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन, अॅनेस्थिसिया असिस्टंट, अॅडव्हान्स्ड फिजिओथेरपी, रेडिओग्राफर या पदांसाठी एकूण 88 जागा भरल्या जाणार आहेत.

loading image
go to top