esakal | भारतीय लष्करात बंपर भरती; तब्बल 28 हजार जागा भरणार, आजच करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Army

भारतीय लष्कर आणि सीएपीएफमध्ये बंपर भरती निघाली असून या अंतर्गत 28 हजारांहून अधिक रिक्त पदांवर भरती होणार आहे.

भारतीय लष्करात बंपर भरती; तब्बल 28 हजार जागा भरणार

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

Army, CAPF Recruitment 2021 : भारतीय लष्कर आणि सीएपीएफमध्ये बंपर भरती निघाली असून या अंतर्गत 28 हजारांहून अधिक रिक्त पदांवर भरती होणार आहे. यात CRPF च्या पॅरामेडिकल स्टाफच्या 2439 पदांचा समावेश आहे, तर माजी सैनिकांसाठी CRPF सह ITBP, SSB आणि BSF मध्ये भरती प्रक्रिया होणार आहे. यात सर्वात मोठी भरती एसएससी जीडी कॉन्स्टेबलची असून या अंतर्गत 25 हजारांहून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठीचा अर्ज 31 ऑगस्टपर्यंत भरता येणार आहे.

यूपीच्या 12 जिल्ह्यांत 'सैन्य भरती'

UP Army Rally 2021 : यूपीच्या 12 जिल्ह्यांत लष्कर भरती मेळावा होणार असून या मेळाव्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 8 जुलै 2021 पासून सुरू आहे, तर अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला 11 दिवस शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांनी अद्याप भरती मेळाव्यासाठी अर्ज केला नाही, ते उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट www.joinindianarmy.nic.in द्वारे अर्ज करू शकतात. या संदर्भात भारतीय लष्कराने आपल्या अधिकृत वेबसाइटवर भरती रॅलीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लष्कराने यात प्रस्तावित रॅलीची तारीख 6 ते 30 सप्टेंबर 2021 अशी केली असून 21 महिन्यांनंतर सैन्यात पुन्हा भरती सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Indian Post : पोस्टात 'या' पदांसाठी मोठी भरती

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 : 25 हजारांपेक्षा जास्त रिक्त जागा

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2021 साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत सीएपीएफ, एनआयए, एसएसएफ आणि आसाम रायफल्समध्ये 25271 पदांची भरती केली जाईल. यात पुरुष कॉन्स्टेबलची 22424 आणि महिला कॉन्स्टेबलची 2847 पदे रिक्त आहेत. तुम्ही SSC च्या वेबसाइटला भेट देऊन यासाठी अर्ज करू शकता. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे.

हेही वाचा: नोकरीची संधी! 'इंडियन ऑईल'मध्ये 480 पदांसाठी भरती

BSF मध्ये GD कॉन्स्टेबलच्या रिक्त जागा

सीमा सुरक्षा दलाने क्रीडा कोटाअंतर्गत (Border Security Force) जीडी कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. उमेदवार, या पदांसाठी BSF च्या अधिकृत वेबसाइटद्वारे bsf.gov.in अर्ज करू शकतात. एकूण 269 रिक्त पदे भरली जातील. या पदांवर अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जारी केलेली अधिसूचना नीट वाचावी. अर्ज प्रक्रिया 9 ऑगस्ट 2021 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2021 आहे.

हेही वाचा: पोलिस भरतीसाठी महत्वाची बातमी, 'ही' माहिती अपडेट न केल्यास रद्द होणार अर्ज

सीआरपीएफ भरती 2021 : पॅरामेडिकल स्टाफची जागा

केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) पॅरामेडिकल स्टाफ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून या अंतर्गत CRPF, ITBP, SSB आणि BSF मध्ये एकूण 2439 पदे भरली जातील. तर कोणत्याही लेखी चाचणीशिवाय उमेदवारांची निवड केली जाईल. यासाठी 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान मुलाखत घेण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी आपण CRPF च्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

loading image
go to top