esakal | भारतीय नौदलात 'या' पदांसाठी होणार भरती! 5 ऑक्‍टोबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Navy

भारतीय नौदलाने एक्‍झिक्‍युटिव्ह, शिक्षण आणि तांत्रिक शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर (एसएससीओ) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

भारतीय नौदलात 'या' पदांसाठी होणार भरती! 5 ऑक्‍टोबरपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारतीय नौदलात (Indian Navy) नोकरी करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी. भारतीय नौदलाने एक्‍झिक्‍युटिव्ह, शिक्षण आणि तांत्रिक शाखेत शॉर्ट सर्व्हिस कमिशन्ड ऑफिसर (Short Service Commissioned Officer - SSCO) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. नौदलाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जनरल सर्व्हिस / हायड्रो कॅडरची (General Service / Hydro Cadre) 45, एअर ट्रॅफिक कंट्रोलरची (Air traffic controller) 4, ऑब्झर्व्हरची (Observer) 8, पायलटची (Pilot) 15 आणि लॉजिस्टिकच्या (Logistic) 18 पदांची भरती केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षण शाखेतील (teaching branch) एकूण 18 पदांसाठी आणि तांत्रिक शाखेत 73 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

हेही वाचा: एक्‍झिक्‍युटिव्ह पदांसाठी 'हिंदुस्थान फर्टिलायझर्स'मध्ये भरती!

असा करा अर्ज

भारतीय नौदलाने जाहिरात प्रसिद्ध केल्यानुसार, शाखा शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स (एसएससीओ) च्या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार नौदलाच्या अधिकृत भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर उपलब्ध ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतील. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल आणि उमेदवार 5 ऑक्‍टोबर 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील. नौदलात अर्ज करण्यासाठी कोणतेही विहित शुल्क नाही.

हेही वाचा: 'आयसीएआय'ने सीए परीक्षेसंदर्भात जाहीर केली महत्त्वपूर्ण अधिसूचना!

जाणून घ्या पात्रता

भारतीय नौदलाच्या तांत्रिक शाखेत एसएसीओ पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार किमान 60 टक्के गुणांसह संबंधित ट्रेडमध्ये बीई/बीटेक उत्तीर्ण असावेत. तर शिक्षण शाखेसाठी उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये 60 टक्के गुणांसह एमएस्सी किंवा एमए किंवा बीई/बीटेक उत्तीर्ण असावे. त्याचप्रमाणे एक्‍झिक्‍युटिव्ह शाखेसाठी उमेदवार 60 टक्के गुण व प्रथम श्रेणीसह BE / B.Tech किंवा MBA किंवा B.Sc / B.Com किंवा MCA / MSc (IT) उत्तीर्ण असावेत. तसेच, सर्व शाखांमध्ये अर्ज करण्यासाठी विहित वयोमर्यादेनुसार उमेदवार 2 जुलै 1997 पूर्वी आणि 1 जानेवारी 2003 नंतर जन्मलेला नसावा.

loading image
go to top