

Job Opportunity In Israel
ESakal
ठाणे : परदेशात करिअर करण्याची इच्छा असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तरुणांसाठी राज्य शासनामार्फत रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांच्या वतीने इस्त्रायलमधील बांधकाम आणि नूतनीकरण क्षेत्रातील १,६०० जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. सिरॅमिक टायलिंग एक हजार पदे, ड्रायवॉल वर्कर्स ३०० पदे, मेसन (गवंडी काम) ३०० पदे अशी १,६०० पदे आहेत.