जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४५० शिक्षकांची पदे रिक्त, आता भरती MPSC मार्फत होणार? | Teachers Recruitment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jilha Parishad Teachers Recruitment:

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ४५० शिक्षकांची पदे रिक्त, आता भरती MPSC मार्फत होणार?

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा या शिक्षणासाठी उत्तम मार्ग आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमांकडे वाढणारा कल यामुळे मराठी माध्यमांच्या म्हणजेच जिल्हा परिषदच्या शाळेकडे दुर्लक्ष होत गेले.

विद्यार्थ्यांच्या कमी होणारी संख्या, त्यात शिकविणारेही अपुरे यामुळे जिल्हा परिषदच्या शाळा संपायच्या मार्गावर आल्या आहेत. याचं एकमेव कारण शिक्षक भरती थांबवण्यात आलेली आहे. अनेक वर्षांपासून शिक्षक भरती (Teacher Recruitment) घेण्यात आली नाही. आणि यात धक्कादायक म्हणजे जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत.

हेही वाचा: JOB : रोजगाराच्या बाबतीत टॉप-10 कंपन्यांपैकी 5 कंपन्या भारतीय, जगात वाजतोय डंका

ग्रामीण भागातील शिक्षणासारख्या गंभीर विषयावर राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे. यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त असल्याने आणि यासाठी जागा न भरल्याने अनेक गरजू रोजगाराला मुकले आहे. या शिवाय गेल्या १८ वर्षांपासून तासिका शिक्षकांच्याही मानधनात कोणतीही वाढ करण्यात आली नाही.

हेही वाचा: JOB UPDATES: ८वी आणि १०वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी

शिक्षक भरती प्रक्रियेत काहीसा बदल करत ही भरती आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच एमपीएससी (MPSC) मार्फत केली जावी अशा मागणीचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षक भरतीचा मार्ग अधिक कठीण होणार, असे बोलले जाते.

Web Title: Job Recruitment Available For 450 Vacancy Teachers Post In Zilla Parishad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..