Govt Jobs: मध्यरेल्वेत निघाली 2500 हून अधिक जागांची भरती; असा करा अर्ज

central railway india recruitment
central railway india recruitment

मुंबई - Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या रेल्वे भरती विभागाने नव्या भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. Apprentice च्या पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.  रल्वेने यासाठी 6 फेब्रुवारीपासून अर्ज मागितले असून पात्र उमेदवारांना रेल्वेच्या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहेत.

मध्य रेल्वेच्या Apprentice भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 5 मार्च 2021 पर्यंत असणार आहे. यासाठी अर्ज करायचा असल्यास तो rrccr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

रेल्वेनं एकूण 2532 पदांसाठी जाहीरात काढली असून यामध्ये वेगवेगळ्या विभागात भरती केली जाणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापूरसह इतर ठिकाणी भरती होईल. यामध्ये कॅरेज, वेगॉन, मुंबई कल्याण डिझेल शेड, परळ वर्कशॉप, मनमाड वर्कशॉप यांचा समावेश आहे.

Mumbai
Carriage & Wagon (Coaching) Wadi Bunder - 258 Posts
Mumbai Kalyan Diesel Shed - 53 Posts
Kurla Diesel Shed - 60 Posts
Sr.DEE (TRS) Kalyan - 179 Posts
Sr.DEE (TRS) Kurla - 192 Posts
Parel Workshop - 418 Posts
Matunga Workshop - 547 Posts
S&T Workshop, Byculla - 60 Posts

Bhusawal
Carriage & Wagon Depot - 122 Posts
Electric Loco Shed, Bhusawal - 80 Posts
Electric Locomotive Workshop - 118 Posts
Manmad Workshop - 51 Posts
TMW Nasik Road - 49 Posts

Pune
Carriage & Wagon Depot - 31 Posts
Diesel Loco Shed - 121 Posts

Nagpur
Electric Loco Shed - 48 Posts
Ajni Carriage & Wagon Depot - 66 Posts

Solapur
Carriage & Wagon Depot - 58 Posts
Kurduwadi Workshop - 21 Posts

अर्ज करण्यासाठी 6 फेब्रुवारीपासून लिंक ओपन होईल तर शेवटची तारीख 5 मार्च 2021 असणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 10 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किमान 50 टक्के गुणांची अट यामध्ये आहे. उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे इतकं असावं. 

भरतीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. गुणांच्या आणि आयटीआयच्या मार्कांच्या आधारावर ही यादी असणार आहे. अर्ज करण्यासाठी 100 रुपये फी असून अर्ज केल्यानंतर उमेदवाराला रजिस्ट्रेशन नंबर दिला जाईल. पुढच्या सर्व प्रक्रियेसाठी हा रजिस्ट्रेशन नंबर लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com