मंद्रूप, कुंभारी MIDC चा तिढा सुटेना! तरुणांच्या हाताला काम मिळेना

सोलापूरच्या मंद्रूप, कुंभारी एमआयडीसीचा तिढा सुटेना ! तरुणांच्या हाताला काम मिळेना
सोलापूरच्या मंद्रूप, कुंभारी एमआयडीसीचा तिढा सुटेना ! तरुणांच्या हाताला काम मिळेना
सोलापूरच्या मंद्रूप, कुंभारी एमआयडीसीचा तिढा सुटेना ! तरुणांच्या हाताला काम मिळेनाCanva
Summary

सोलापूर जिल्ह्यात तरुणांची मोठी ताकद असून 20 ते 39 वयोगटात सहा लाख 75 हजार 850 तरुण आहेत. ठाणे, मुंबई, पुण्यानंतर आता जिल्ह्यात उद्योग वाढीला मोठी संधी असल्याचे जाणकारांचे मत आहे.

सोलापूर : जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम (Jobs) मिळावे, स्थलांतर थांबविण्याच्या हेतूने तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांच्या प्रयत्नातून मंद्रूप व कुंभारीत एमआयडीसी (MIDC) सुरू करण्याच्या हालचाली झाल्या. मात्र, मंद्रूप एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांचा विरोध, तर कुंभारी एमआयडीसीची प्रस्तावित जागा होटगी वितरिका लाभक्षेत्रात येते. त्यामुळे जलसंपदा विभागाशी मागील दोन वर्षांपासून "एमआयडीसी'ने पाठपुरावा केला. जलसंपदा विभागाने जागेच्या मोबदल्यात 21 कोटींची मागणी केल्याने अजूनही तो प्रश्‍न सुटलेला नाही.

सोलापूरच्या मंद्रूप, कुंभारी एमआयडीसीचा तिढा सुटेना ! तरुणांच्या हाताला काम मिळेना
नोकरीनिमित्त तरुण बनले 'पुणेरी सोलापूरकर'!

सोलापूर जिल्ह्यात तरुणांची मोठी ताकद असून 20 ते 39 वयोगटात सहा लाख 75 हजार 850 तरुण आहेत. ठाणे, मुंबई, पुण्यानंतर आता जिल्ह्यात उद्योग वाढीला मोठी संधी असल्याचे जाणकारांचे मत आहे. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील अनेकांनी आयटी इंडस्ट्रीसाठी प्रयत्न केला. मात्र, इच्छा असूनही विमानसेवा सुरू नसल्याने अनेक उद्योजकांनी त्यासाठी पाठ फिरविल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या शोधात जन्मभूमी सोडून पुणेरी सोलापूकर व्हावे लागले. उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी तीन ते पाच वर्षांसाठी तो भूखंड त्यांना दिला जातो. मात्र, मुदत संपूनही उद्योग सुरू न केलेल्यांना नोटीस देऊन त्यावर खुलासा मागविला जातो. रास्त कारण देणाऱ्यांना पुन्हा काही टप्प्यात वर्षाची मुदतवाढ दिली जाते. दुसरीकडे चिंचोळी एमआयडीसीमध्ये जवळपास 120 जणांनी पाच वर्षांपूर्वी उद्योगासाठी भूखंड घेऊन ठेवल्याची विदारक स्थिती समोर आली आहे. दुसरीकडे एमआयडीसीत 250 एकर जमीन आहे, परंतु त्याचेही प्लॉटिंग पडलेले नाही. या सर्व बाबींकडे ठोसपणे कोणीच पाहत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

उद्योगमंत्री 2016 पासून फिरकलेच नाहीत

चिंचोळी एमआयडीसी परिसरात उद्योजकांच्या अडचणींवर विचारमंथन व्हावे, त्या ठिकाणी त्यांना एकत्रितपणे बसून प्रश्‍नांची सोडवणूक करता येईल, या हेतूने उद्योग भवन उभारण्यात आले. त्याच्या शुभारंभाला 2016 मध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई हे आले होते. त्यावेळी उद्योजकांच्या अडचणी सोडविताना त्यांना जास्त हेलपाटे मारावे लागणार नाही, त्यांच्यासाठी एक खिडकी योजना आणल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, मागील चार वर्षांत त्यांना एकदाही सोलापूरला यायला जमले नाही, हे विशेष.

सोलापूरच्या मंद्रूप, कुंभारी एमआयडीसीचा तिढा सुटेना ! तरुणांच्या हाताला काम मिळेना
वडिलांनी ज्यूस बार चालविले, पण मुलाला 'आयपीएस' बनविलेच!

अक्‍कलकोट एमआयडीसीत नवीन उद्योगासाठी जागा शिल्लक नाही. चिंचोळी एमआयडीसीत जवळपास अडीचशे एकर जागा शिल्लक असून ज्यांनी नुसतीच जागा घेऊन ठेवली आहे, अशांवर कार्यवाही सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणीत आता तिथेच सोडविल्या जात असून त्यांना सांगलीला हेलपाटे मारावे लागत नाहीत.

- एस. टी. राठोड, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com