
Government Jobs May 2025 : नवीन महिन्याची सुरुवात सरकारी नोकरीच्या संधींनी झाली आहे. मे २०२५ मध्ये विविध सरकारी विभागांमध्ये हजारोंच्या संख्येने रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. रेल्वे, लष्कर, पोलीस, बँक, शिक्षक, नर्सिंग यांसारख्या क्षेत्रात इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी अर्ज करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
रेल्वे भरती मंडळ (RRB) कडून ९,९७० Assistant Loco Pilot पदांसाठी अर्ज मागवले आहेत. १०वी उत्तीर्ण आणि ITI पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. अर्जाची अंतिम तारीख: १३ मे २०२५.
अर्ज लिंक: www.rrbapply.gov.in
टेक्निकल सर्व्हिस कमिशन (TSC) मार्फत ११,३८९ नर्सिंग पदांवर भरती होत आहे. नर्सिंग क्षेत्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
अर्जाची अंतिम तारीख: २३ मे २०२५
अर्ज लिंक: btsc.bihar.gov.in
Technical Graduate Course (TGC 141) अंतर्गत भारतीय लष्करात भरती सुरू आहे. २० ते २७ वर्षे वयोगटातील अभियंता पदवीधारक उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्जाची अंतिम तारीख: २९ मे २०२५
अर्ज शुल्क: शून्य
बँकिंग क्षेत्रात करीयर करू इच्छिणाऱ्यांसाठी युनियन बँकने ५०० असिस्टंट मॅनेजर पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
अर्जाची अंतिम तारीख: २० मे २०२५
अर्ज लिंक: ibpsonline.ibps.in
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी विविध ३५ विभागांमध्ये भरती सुरू आहे. किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे.
अर्जाची अंतिम तारीख: २ मे २०२५
Junior Executive पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी चांगला पगार आणि स्थिरता मिळू शकते.
अर्जाची अंतिम तारीख: २४ मे २०२५
अर्ज लिंक: www.aai.aero
या सर्व भरतींसाठी वेगवेगळ्या अंतिम तारखा आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपली पात्रता तपासून लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी गमावू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.