MBA : एमबीए अभ्यासक्रमासाठी १४ जुलैपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज

राज्यात एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
Online-Admission
Online-AdmissionSakal

पुणे - राज्यात एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन नोंदणी करण्यास १४ जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

राज्यातील सरकारी, अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापन असणाऱ्या संस्था, विद्यापीठांमधील विभाग, विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शिक्षण संस्था यांसह विविध शिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४मध्ये ‘एमबीए’ या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ३७ हजार ५९ हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तर १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज निश्चित केले आहेत.

एमबीए अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन नोंदणीसाठी १४ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रवेश फेऱ्यांचा तपशील लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :

तपशील : कालावधी

- ऑनलाइन नोंदणी, प्रवेशास आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे : १४ जुलै

- कागदपत्रांची पडताळणी, ऑनलाइन अर्ज निश्चित करणे : १५ जुलै

विद्यार्थी-पालकांसाठी सूचना :

- कागदपत्रांच्या पडताळणीसाठी ‘ई-स्क्रुटनी’ची सोय उपलब्ध

- प्रत्यक्ष जाऊन पडताळणीसाठी पडताळणी केंद्रांची यादी संकेतस्थळावर

- कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया शनिवारी आणि रविवारी देखील खुले असेल

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.mahacet.org

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com