Maharashtra Medical Council
Maharashtra Medical Councilesakal

मेडिकल प्रवेश प्रक्रिया भाग - २

पहिल्या टप्प्यात गट ‘अ’ची म्हणजेच एमबीबीएस/बीडीएसची प्रथम फेरी झाल्यावर ‘गट ब’ व ‘गट क’ ची प्रथम फेरी होईल.

के. रवींद्र

मेडिकल प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सुरू झाली आहे, यावर्षी ३ कॅप राउंड होतील, त्यानंतर स्वतंत्रपणे उर्वरित रिक्त जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने ‘स्ट्रे व्हेकन्सी राउंड’ होईल.

Maharashtra Medical Council
Pune : रस्त्याअभावी अतिदुर्गम घिसरच्या धनगर वस्त्यांमधील विद्यार्थी, महिलांसह वृद्धांची ससेहोलपट कायम

तत्पूर्वी ‘एमबीबीएस’ व ‘बीडीएस’साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ३ ऑगस्ट २०२३ पर्यंत स्वतःच्या लॉगिन आयडीमधून प्रेफरन्स फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरावा. सबमिट बटनावर क्लिक केल्यावर ऑप्शन फॉर्म बदलता येत नाही. प्रेफरन्स फॉर्म भरताना तीन गट केलेले आहेत.

गट अ - एमबीबीएस/बीडीएस अभ्यासक्रमांसाठी

गट ब - आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी अभ्यासक्रमांसाठी

गट क - फिजिओथेरपी, ॲक्युपेशनल थेरपी, बीएएसएलपी व बीपीओ अभ्यासक्रमांसाठी

पहिल्या टप्प्यात गट ‘अ’ची म्हणजेच एमबीबीएस/बीडीएसची प्रथम फेरी झाल्यावर ‘गट ब’ व ‘गट क’ ची प्रथम फेरी होईल. पसंतीक्रम भरताना कॉलेजकोड हा ४ अंकी असेल, यामागे ‘S’ तर याचा अर्थ सर्व सरकारी/कॉर्पोरेशन कॉलेजेसच्या जागा आणि खासगी महाविद्यालये/अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी ८५ टक्के जागा या राखीव आहेत.

Maharashtra Medical Council
Education Department : मास्तरांनो, एक चूक पडू शकते महागात! शाळेत तंबाखू, मद्यसेवन केल्याचे आढळल्यास थेट होणार कारवाई

आणि ‘N’ असेल तर त्या खासगी महाविद्यालये/अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी १५ टक्के जागा या महाविद्यालयीन कोटासाठी राखीव आहेत. विद्यार्थी महाविद्यालयीन कोटासाठी प्राधान्य देत असेल तर एक त्या कॉलेजचे शुल्क किती आहे हे ‘शुल्क नियामक प्राधिकरणच्या’ अधिकृत वेबसाइटवर तपासून पहावी.

कॅप- फेरी प्रक्रिया

१. प्रथम फेरीमध्ये मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा. प्रवेश घेतलेले विद्यार्थी पुढील फेरी करिता गृहीत धरले जाणार नाहीत.

२. ज्या विद्यार्थ्यांना प्रथम फेरीमध्ये कॉलेज मिळाले आणि त्यांनी जॉइन केले, परंतु मिळालेल्या महाविद्यालयापेक्षा अधिक चांगले महाविद्यालय पाहिजे असेल म्हणजेच अपग्रेड करायचे असेल व त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला नसेल तर ते दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा नव्याने पसंतीक्रम फॉर्म भरू शकता.

३. प्रथम फेरीमध्ये कॉलेज मिळाले परंतु त्यांनी मिळालेल्या महाविद्यालयाला रिपोर्ट नाही केले असे विद्यार्थी द्वितीय फेरीमध्ये फॉर्म भरू शकता. अशा परिस्थितीत त्यांचे प्रथम फेरीमध्ये मिळालेले महाविद्यालय रद्द होईल. परत नव्याने पसंतीक्रम फॉर्म भरावा लागेल.

४. प्रथम फेरीमध्ये पसंतीक्रम दिला नाही असे विद्यार्थी

५. प्रथम फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले नाही असे विद्यार्थी

६. प्रथम फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले परंतु संस्थेने कागदपत्र पडताळणीमध्ये रद्द झालेले परंतु विद्यार्थी अन्यथा निवडीसाठी पात्र आहे. त्यांची पहिल्या फेरीतील निवड वैध राहणार नाही. दुसऱ्या फेरीत फक्त उपलब्ध जागांवर पात्र असतील.

महाविद्यालये...

Maharashtra Medical Council
Abroad Medical Education camp : परदेशात वैद्यकीय शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर

कोर्स उपलब्ध महाविद्यालयांची

संख्या

एमबीबीएस ३१ शासकीय, २३ खासगी

बीडीएस ४ शासकीय, २६ खासगी

बीएएमएस २१ शासकीय, ६१ खासगी

बीएचएमएस ५६

बीयुएमएस ३ शासकीय, ४ खासगी

फिजिओथेरपी ४ शासकीय, ७८ खासगी

ॲक्युपेशनल थेरपी ४ शासकीय

बीएएसएलपी २ शासकीय

बीपीओ १ शासकीय

महत्त्वाच्या लिंक :

१) https://cetcell.mahacet.org/CAP_landing_page_२०२३/

२)https://vidyarthimitra.org/news

(लेखक विद्यार्थी मित्र www.VidyarthiMitra.orgचे संस्थापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com