esakal | उद्या देशभरात होणार NEET exam; परिक्षेला जाताना घ्या ही काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

neet exam

NEET परिक्षेला जाताना घ्या ही काळजी...

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (NEET) परीक्षा उद्या (ता.१२) देशभरातील परीक्षा केंद्रांवर होणार आहे. जिल्‍ह्‍यातील चोवीस परीक्षा केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेला साडे आठ हजाराहून अधिक विद्यार्थी समोरे जाणार आहेत. गेल्‍या वर्षी कोरोनामुळे (Corona) परीक्षा केंद्रातील निर्बंधांवर काहीशी शिथिलता दिलेली होती. मात्र यंदा नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सीने जारी केलेल्‍या दिशानिर्देशांनुसार वेशभुषेसह अन्‍य बाबींची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

अशा आहेत महत्त्वाच्‍या सूचना

उद्या (ता.१२) दुपारी दोन ते सायंकाळी पाच अशी तीन तास कालावधीची ही परीक्षा पार पडेल. प्रवेशाच्‍या अंतीम मुदतीच्‍या वेळेच्या किमान दोन तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्‍थित राहायचे आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पेन व आवश्‍यक बाबी केंद्रावर उपलब्‍ध करुन दिले जाणार आहे. कुठल्‍याही स्‍वरुपाचे इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू, साधन, हातातील इलेक्‍ट्रॉनिक घड्याळ (Smartband) ला मनाई केलेली आहे. विद्यार्थ्यांनी सैल कपडे व साधी चप्पल किंवा सँडल घालायचा आहे. मोठ्या बाह्यांचे शर्टला मनाई केलेली आहे. विद्यार्थ्यांना मास्‍कसोबतच वैध ओळखपत्राची मूळ प्रत, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत न्‍यायचे आहे.

हेही वाचा: कोणी लस घेता का लस! प्रशासनाचे नागरिकांना साकडे

कोरोनामुळे नीट परीक्षा लांबणीवर गेली होती. दीर्घ प्रतीक्षेनंतर परीक्षेला मुहुर्त लागला असून, एनटीएने जाहीर केल्‍यानुसार उद्या (ता.१२) ही परीक्षा होते आहे. परीक्षेतील कामगिरीच्‍या आधारे एमबीबीएस या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासह दंतशास्‍त्र (BDS), आयुर्वेद (BAMS), युनानी (BUMS), होमिओपॅथी (BHMS), परीचारीका (B.Sc. Nursing), फिजिओथेरेपी व अन्‍य वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा: महाआघाडीत बिघाडी; छगन भुजबळ-सेना आमदारामध्ये जुंपली

loading image
go to top