esakal | NEET पोस्टग्रॅज्युएट परीक्षेची तारीख जाहीर; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

NEET UG

NEET पोस्टग्रॅज्युएट परीक्षेची तारीख जाहीर

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : NEET पदव्युत्तर पदवी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, ११ सप्टेंबर २०२१ रोजी ही परीक्षा होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनुसख मांडवीय यांनी ट्विटद्वारे ही घोषणा केली. मेडिकलच्या पदव्युत्तर पदवीसाठीच्या कोर्सेससाठी ही परीक्षा घेण्यात येते. (NEET Postgraduate exam on 11th September 2021 tweets Mansukh Mandaviya)

आरोग्यमंत्री मांडवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं, "नीट पोस्टग्रॅज्युएट परीक्षा ११ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्याचं आपण ठरवलं आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या मेडिकलच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा!"

हेही वाचा: देशातील पहिल्या रुग्णाला दीड वर्षानंतर पुन्हा कोरोनाची लागण

दरम्यान, NEET च्या पदवी परीक्षेची नोंदणी प्रक्रिया आजपासून (मंगळवार) सुरु झाली आहे. ही परीक्षा १२ सप्टेंबरला पार पडणार आहे. NEET परीक्षेची तारीख शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १२ जुलै रोजी जाहीर केली होती. या परीक्षेसाठीचे नोंदणी अर्ज NEET च्या वेबसाईटवर उपलब्ध असून ६ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

loading image