मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर मेकॅट्रॉनिक्‍स, रोबोटिक्‍समध्ये नव्या संधी | Educational News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर मेकॅट्रॉनिक्‍स, रोबोटिक्‍समध्ये नव्या संधी!
मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर मेकॅट्रॉनिक्‍स, रोबोटिक्‍समध्ये नव्या संधी!

मेकॅनिकल इंजिनिअरिंगनंतर मेकॅट्रॉनिक्‍स, रोबोटिक्‍समध्ये नव्या संधी!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये (Mechanical Engineering) पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मेकॅट्रॉनिक्‍ससारख्या (Mechatronics) आधुनिक उपयोजित शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. हे शिक्षण अद्ययावत असून त्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्‍ट्रानिक्‍सच्या ज्ञानाचा समावेश आहे. सध्याच्या स्थितीत मेकॅट्रॉनिक्‍स, एअरोस्पेस (Aerospace) व रोबोटिक्‍स (Robotics) या तीनही शाखांमध्ये उत्तम करिअरच्या संधी आहेत. यासोबत विदेशातील उच्च शिक्षण व नोकरीच्या संधीचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घेतला पाहिजे, असे मत प्रा.डॉ. श्रीनिवास मेतन (Dr. Shriniwas Metan) यांनी व्यक्त केले.

हेही वाचा: रवींद्र खंदारे करणार 'निपुण भारत'साठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व!

डॉ. मेतन फाउंडेशनच्या वतीने बारावी सीईटी उत्तीर्ण व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन शिबिर झाले. त्या वेळी प्रा. डॉ. श्रीनिवास मेतन बोलत होते. व्यासपीठावर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन, प्रा. डॉ. श्रीनिवास मेतन, फाउंडेशनचे संचालक सोमेश्‍वर लवंगे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. मेतन पुढे म्हणाले की, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना मेकॅट्रॉनिक्‍ससारख्या आधुनिक उपयोजित शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेता येते. हे शिक्षण अद्ययावत असून त्यामध्ये मेकॅनिकल, इलेक्‍ट्रानिक्‍सच्या ज्ञानाचा समावेश आहे. या माध्यमातून नव्या प्रकारच्या इंजिन, मशिन, अप्लायन्सेसपर्यंत अनेक प्रकारच्या निर्मितीमध्ये सहभाग घेणे शक्‍य होते. एअरोस्पेस क्षेत्रात संशोधनाचे क्षीतिज विस्तारत असून प्रगतशील देशांकडून या क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली जात आहे. त्यामुळे संशोधन व संशोधकांची मागणी वाढली आहे.

हेही वाचा: सोलापूरच्या विद्या कुलकर्णी यांची CBI च्या संयुक्त संचालकपदी निवड

रोबोटिक्‍स ही नवीन ज्ञानशाखा विस्तारत आहे. आर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये रोबोट निर्मिती, एअरक्राफ्ट निर्मितीसाठी विद्यार्थ्यांना विशेष अर्थसहाय उपलब्ध केले जात आहे. महाविद्यालयातील स्टडी अब्रॉड सेलच्या माध्यमातून 50 विद्यार्थी विदेशात शिक्षण घेण्यासाठी गेले आहेत. या पद्धतीने सोलापुरातील शिक्षणाच्या माध्यमातून उत्तम करिअरचे ध्येय गाठणे शक्‍य असल्याचे त्यांनी सांगितले.

loading image
go to top