
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी! मिळणार लाखात पगार
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (National Film Development Corporation LTD. Mumbai) इथे नोकरीची संधी आहे. यासाठीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. व्यवस्थापक, उपव्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असून पात्र उमेदवारांना १० एप्रिलपर्यंत अर्ज करायचा आहे. एकूण ९ जागा भरायच्या असून यासाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
हेही वाचा: Gold Loan: 'या' बॅंका देतात स्वस्त गोल्ड लोन! फक्त ही घ्या काळजी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
व्यवस्थापक (Manager) - उमेदवाराने ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट केलेले असावे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे. संबधित पदावर काम केल्याता सात ते दहा वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी उमेदवारांना 1,00,000 रुपये पगार दर महिन्याला मिळणार आहे.
उपव्यवस्थापक (Deputy Manager)- उमेदवाराने ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट केलेले असावे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले असावे.संबधित पदावर काम केल्याता सात ते दहा वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी उमेदवारांना 85,000 रुपये पगार दर महिन्याला मिळणार आहे.
हेही वाचा: बायकोच्या नावाने उघडा Special Account! महिन्याला मिळतील ४५ हजार
या पत्यावर करा अर्ज - महाव्यवस्थापक (पी अँड ए), नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, डिस्कव्हरी ऑफ इंडिया इमारत, 6 वा मजला, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400 018 या पत्त्यावर उमेदवारांना अर्ज करायचा आहे.
हेही वाचा: उशीरा लग्न केल्याने नात्यावर होतात ४ परिणाम
Web Title: Nfdc Mumbai Recruitment 2022 Jobs In Mumbai Apply Offiline
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..