esakal | फार्मसी शिक्षणात महाराष्ट्र अव्वल! 'एनआयआरएफ'चे राष्ट्रीय रॅंकिंग जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

फार्मसी शिक्षणात महाराष्ट्र अव्वल! 'एनआयआरएफ'चे राष्ट्रीय रॅंकिंग जाहीर

फार्मसीच्या दर्जेदार शिक्षणात देशात महाराष्ट्र अव्वल असल्याची मोहोर 'एनआयआरएफ'ने (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क) उमटवली.

'फार्मसी'त महाराष्ट्र अव्वल! 'NIRF'चे राष्ट्रीय रॅंकिंग जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : फार्मसीच्या (Pharmacy) दर्जेदार शिक्षणात देशात महाराष्ट्र (Maharashtra) अव्वल असल्याची मोहोर 'एनआयआरएफ'ने (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्क) (National Institutional Ranking Framework) उमटवली. त्यात देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई (Mumbai) आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याने (Pune) आपला ठसा उमटविला आहे. देशातील या वर्षीची फार्मसी महाविद्यालयांची श्रेणी (रॅंकिंग) 'एनआयआरएफ'ने नुकतीच जाहीर केली. त्यात प्रथम 75 पैकी क्रमवारीत 12 महाविद्यालये महाराष्ट्रातील आहेत. त्यातही मुंबईमधील पाच आणि पुण्यातील दोन महाविद्यालयांचा समावेश आहे.

हेही वाचा: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत फॅकल्टी पदांची भरती!

एनआयआरएफने रॅंकिंगमध्ये 351 फार्मसीचे शिक्षण देणाऱ्या देशभरातील संस्था सहभागी झाल्या होत्या. यात पहिले रॅंकिंग नवी दिल्ली येथील जामिया हमदर्द संस्थेला मिळाले. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजीचा पहिल्या पाचमध्ये समावेश झाला. फार्मसी विद्यालयांची संख्या महाराष्ट्रात सर्वांत जास्त आहे व यामध्ये पुणे जिल्हा अग्रेसर आहे.

मूल्यांकनाचे प्रमुख निकष

  • अध्यापन

  • संशोधन व व्यावसायिकता

  • पदवीधरांना मिळालेला रोजगार

  • पदवीधरांची उपयुक्तता

  • समाजातील पोहोच व सर्वसमावेशकता

  • समाजातील स्थान

हेही वाचा: शाळा सुरू करण्याचा 'या' दिवशी निर्णय! मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

भविष्यातील उद्देश

आपल्याकडची शिक्षणाची गुणवत्ता खूप चांगली आहे. पण आपल्याला मर्यादा पडतात ते संशोधन क्षेत्रात. त्यामुळे भविष्यात संशोधन आणि विकासावर भर देण्याचा उद्देश निश्‍चित करणे ही काळाची गरज असल्याचे मत फार्मसी क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

हेही वाचा: महिलांसाठी खुषखबर! टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये होणार मोठी भरती

'एनआयआरएफ'चे महत्त्व

एनआयआरएफ ही संस्था केंद्रीय मनुष्यबळ संसाधन विकास मंत्रालयाच्या मान्यतेने 2016 पासून सुरू करण्यात आली. या संस्थेमार्फत देशभरातील शिक्षण संस्थांची निश्‍चित निकषांच्या आधारावर मूल्यांकन करून त्याची रॅंकिंग नेमकेपणाने दिले जाते.

शैक्षणिक राष्ट्रीय क्रमवारीत भारती विद्यापीठाच्या "पूना कॉलेज ऑफ फार्मसी'ने सतरावा क्रमांक पटकावला आहे. संशोधनाच्या आधारे व त्यामुळे वाढलेल्या प्लेसमेंटमुळे मागील वर्षी 22 व्या क्रमांकावर असलेले हे महाविद्यालय आता थेट पाच क्रमांकाने वर आले आहे. राज्यात ते तिसऱ्या क्रमांकावर पोचले आहे.

- डॉ. आत्माराम पवार, प्राचार्य, पूना कॉलेज ऑफ फार्मसी

क्रमवारीतील पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये

  • पूना कॉलेज ऑफ फार्मसी

  • डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ऍण्ड रिसर्च

loading image
go to top