Nishu Kumari Success Story
esakal
गया (बिहार) : जिद्द, कठोर परिश्रम आणि शिक्षणाची आवड असेल, तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे बिहारमधील निशु कुमारी हिने सिद्ध करून दाखवले आहे. गया जिल्ह्यातील खिजर्सराय ब्लॉकमधील लोदीपूर गावातील रहिवासी असलेल्या निशुने बिहार स्कूल एक्झामिनेशन बोर्डाच्या बारावी (कला शाखा) परीक्षेत ५०० पैकी तब्बल ४७९ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. आता तिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय ठेवले (Nishu Kumari 479 marks out of 500) आहे.