Ukraine returned students : युक्रेनहून परतलेल्यांच्या शिक्षणाचा तिढा सुटला

युक्रेनने ऑफर केलेल्या मोबिलिटी प्रोग्रामचा आयोगामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सल्लामसलत करून विचार केला गेला आहे.
Ukraine returned students
Ukraine returned studentsgoogle

मुंबई : युद्धग्रस्त युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना आता इतर देशांतील विद्यापीठांमध्ये स्थलांतरित होण्याची आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

विशेष परिस्थिती लक्षात घेऊन, नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) युक्रेनने देऊ केलेल्या शैक्षणिक मोबिलिटी प्रोग्रामला मान्यता देण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी दिली जाईल. ही पदवी केवळ पालक युक्रेनियन विद्यापीठाद्वारे दिली जाईल.

Ukraine returned students
विद्यार्थीदशेत स्वखर्चासाठी करता येतील हे part-time job

एनएमसी कायद्यानुसार, परदेशी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करणे आणि एकाच विद्यापीठातून पदवी घेणे बंधनकारक आहे. एनएमसीने मंगळवारी जाहीर केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे की युक्रेनने ऑफर केलेल्या मोबिलिटी प्रोग्रामचा आयोगामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी सल्लामसलत करून विचार केला गेला आहे.

यामध्ये असे सूचित केले गेले आहे की शैक्षणिक गतिशीलता कार्यक्रम हा जागतिक स्तरावर विविध देशांतील इतर विद्यापीठांमध्ये तात्पुरता पुनर्स्थापित आहे.

Ukraine returned students
AIIMS Recruitment 2022 : एम्स रुग्णालयात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू

विद्यार्थ्यांना ही पदवी मूळ युक्रेनियन विद्यापीठाकडून दिली जाईल, अशी NMC ची अधिकृत सूचना आहे. "याद्वारे आयोगाने युक्रेनमध्ये शिकत असलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या संदर्भात शैक्षणिक गतिशीलता कार्यक्रमासाठी आपली हरकत नसल्याचे सांगितले आहे. तसेच स्क्रीनिंग टेस्ट रेग्युलेशन्स 2002 चे सर्व निकष पूर्ण झाले आहेत," असे सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com