esakal | Education : आता मुलीही घेऊ शकतील मिलिट्री स्कूल व कॉलेजमध्ये प्रवेश! संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

आता मुलीही घेऊ शकतील मिलिट्री स्कूल व कॉलेजमध्ये प्रवेश!

सध्या या शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.

आता मुलीही घेऊ शकतील मिलिट्री स्कूल व कॉलेजमध्ये प्रवेश!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : आता मुलींनाही देशभरातील विविध राष्ट्रीय मिलिट्री स्कूल (Rashtriya Military School - RMS) आणि राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेजमध्ये (Rashtriya Indian Military College - RIMC) प्रवेश दिला जाईल. सध्या या शैक्षणिक संस्थांमध्ये केवळ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता.

संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, मुली लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्येही शिकू शकतात. यासाठी केंद्र सरकारकडून संबंधित नियमांमध्ये आवश्‍यक सुधारणा केल्या जात आहेत. तथापि, लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींचे प्रवेश पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच 2022-23 पासून घेतले जाऊ शकतात. लष्करी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये महिला उमेदवारांचे प्रवेश जून 2022 मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेद्वारे केले जातील.

हेही वाचा: मेट्रोमध्ये जीएम, एजीएम अन्‌ मॅनेजर पदांची भरती!

मुलींच्या प्रवेशामुळे वाढेल जागांची संख्या

संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय इंडियन मिलिट्री कॉलेजमध्ये (आरआयएमसी) मुलींच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जागांची संख्या 250 वरून 300 केली जाईल. दर सहा महिन्यांनी या प्रक्रियेत पाच मुलींचा समावेश केला जाईल. त्याचबरोबर, दुसऱ्या टप्प्यात, सहा महिन्यांत 10 मुलींचा समावेश केला जाईल. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलींच्या जागा 300 ते 350 पर्यंत वाढवल्या जातील. या क्रमाने, 2027 पर्यंत मुलांसाठी 250 जागा आणि मुलींसाठी 100 जागा टप्प्या-टप्प्याने केल्या जातील.

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच केंद्र सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला (UPSC) निर्देश दिले, की भारतीय सेना, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलात भरतीसाठी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) परीक्षेत महिला उमेदवारांचाही समावेश करा.

loading image
go to top