मेट्रोमध्ये जीएम, एजीएम अन्‌ मॅनेजर पदांची भरती!

मेट्रोमध्ये जीएम, एजीएम अन्‌ मॅनेजर पदांची भरती ! 29 ऑक्‍टोबरपर्यंत करा अर्ज
मेट्रोमध्ये जीएम, एजीएम अन्‌ मॅनेजर पदांची भरती
मेट्रोमध्ये जीएम, एजीएम अन्‌ मॅनेजर पदांची भरतीCanva
Summary

अर्जदारांनी लक्षात घ्यावे की, शेवटच्या तारखेनंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही.

सोलापूर : मेट्रोमध्ये (Metro) नोकरी (Jobs) मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडने (Chennai Metro Rail Limited) विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या अंतर्गत जीएम, एजीएम आणि मॅनेजर पदांसाठी अर्ज करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडच्या chennaimetrorail.org या अधिकृत साइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्‍टोबर 2021 पर्यंत आहे. अर्जदारांनी लक्षात घ्यावे की, शेवटच्या तारखेनंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही. या भरती मोहिमेद्वारे एकूण सात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

मेट्रोमध्ये जीएम, एजीएम अन्‌ मॅनेजर पदांची भरती
Jobs : रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या विविध 4103 पदांची भरती!

रिक्त पदांचा तपशील

चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जीएमच्या एका पदावर आणि जीएम अंडरग्राउंड कन्स्ट्रक्‍शनच्या दोन पदांवर भरती केली जाईल. नियुक्ती अनुक्रमे एजीएम लीगल आणि डीजीएम ट्रॅकच्या प्रत्येकी एक पदांवर केली जाईल. याशिवाय मॅनेजर ट्रॅकच्या दोन पदांवर भरती केली जाईल.

असे असेल अर्जाचे शुल्क

अनारक्षित आणि इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क 300 रुपये असेल. तर अनुसूचित जाती / जमातीला 50 रुपये नॉन रिफंड शुल्क भरावे लागेल.

या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आवश्‍यक कागदपत्रे व हार्ड कॉपीसह फक्त पोस्ट / कुरिअरद्वारे CMRL जॉइंट जनरल मॅनेजर (HR), चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड CMRL डेपो, प्रशासन इमारत, पून मल्ली, हाय रोड, कोयंबेडु, चेन्नई( 600 107 या पत्त्यावर पाठविली पाहिजेत. या भरतीशी संबंधित अधिक तपशिलासाठी उमेदवार चेन्नई मेट्रोची अधिकृत साइट तपासू शकतात.

मेट्रोमध्ये जीएम, एजीएम अन्‌ मॅनेजर पदांची भरती
Jobs : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत 3261 सरकारी नोकऱ्या!

अशी होईल निवड...

चेन्नई मेट्रोने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एजीएम, जीएम आणि इतर पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाईल. त्यात वैद्यकीय तपासणी आणि त्यानंतर मुलाखतीचा समावेश आहे. निवड प्रक्रियेत कौशल्ये, ज्ञान, वृत्ती, योग्यता आणि शारीरिक तंदुरुस्ती यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com