esakal | एक्‍झिक्‍युटिव्ह पदांसाठी "हिंदुस्थान फर्टिलायझर्स'मध्ये भरती! वार्षिक 40 लाख पगार
sakal

बोलून बातमी शोधा

एक्‍झिक्‍युटिव्ह पदांसाठी 'हिंदुस्थान फर्टिलायझर्स'मध्ये भरती!

हिंदुस्थान फर्टिलायझर्स अँड रसायन लिमिटेड कंपनीने विविध विभागांमध्ये एक्‍झिक्‍युटिव्ह पदांची भरती करणार आहे.

एक्‍झिक्‍युटिव्ह पदांसाठी 'हिंदुस्थान फर्टिलायझर्स'मध्ये भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : भारत सरकारच्या (Government of India) सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक असलेली हिंदुस्थान फर्टिलायझर्स अँड रसायन लिमिटेड (Hindustan Fertilizers and Chemicals Limited) (HURL) कंपनीने विविध विभागांमध्ये एक्‍झिक्‍युटिव्ह (कार्यकारी) पदांची भरती (Recruitment) करणार आहे. त्यासंदर्भात कंपनीने भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार, तांत्रिक आणि उत्पादन (अमोनिया, युरिया, प्रक्रिया), मार्केटिंग आणि सुरक्षा विभागातील एकूण कार्यकारी पदांच्या एकूण 44 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही पदे फिक्‍स्ड टर्म कॉन्ट्रॅक्‍ट (FTC) तत्त्वावर भरली जाणार आहेत, ज्याचा कालावधी तीन वर्षे असेल. मात्र, मार्केटिंग विभागाच्या रिक्त पदांसाठी कालावधी पाच वर्षे असेल.

हेही वाचा: विमा क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी सरकारी नोकरीची संधी!

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार HURL च्या hurl.net.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरती जाहिरात पाहू शकतात आणि अर्जाचा फॉर्म डाउनलोड करू शकतात. हा फॉर्म पूर्णपणे भरून व आवश्‍यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती जोडून उमेदवारांनी 15 सप्टेंबर 2021 पर्यंत ftc@hurl.net.in या जाहिरातीत दिलेल्या ई-मेल आयडीवर मेल केल्या पाहिजेत.

हेही वाचा: 'आयसीएआय'ने सीए परीक्षेसंदर्भात जाहीर केली महत्त्वपूर्ण अधिसूचना!

अशी होईल निवड...

हिंदुस्थान फर्टिलायझर्स अँड रसायन लिमिटेड (HURL) र्त कार्यकारी पदांसाठी उमेदवारांची निवड वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल, जी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग / ऑनलाइन मोडद्वारे घेतली जाऊ शकते. HURL द्वारे निवडलेल्या उमेदवारांमधून केवळ वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या संदर्भात अधिक माहिती निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना HURL द्वारे दिली जाईल.

इतके असेल वेतन

पोस्टिंगनंतर निवडलेल्या उमेदवारांना HURL द्वारे निर्धारित वेतन निकषांनुसार वेतन दिले जाईल. एक्‍झिक्‍युटिव्ह ग्रेड -5 साठी वार्षिक पगार 40 लाख, तर ग्रेड -4 साठी 27 लाख, ग्रेड -3 साठी 19 लाख, ग्रेड -2 साठी 12.5 लाख आणि ग्रेड -1 साठी 8.5 लाख सीटीसीवर नियुक्त केले जाईल.

loading image
go to top