esakal | PCMC Recruitment 2021 : रेसिडेन्सी पदांची होणार भरती ! परीक्षा नाही; पगार 75 हजारांपर्यंत
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने वरिष्ठ / कनिष्ठ रेसिडेन्सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 25 मे 2021 ते 1 जून 2021 या काळात मुलाखतीस येऊ शकतात.

PCMC Recruitment : रेसिडेन्सी पदांची होणार भरती ! पगार 75 हजारांपर्यंत

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने वरिष्ठ / कनिष्ठ रेसिडेन्सी पदांच्या भरतीसाठी (senior resident vacancy in PCMC) अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार 25 मे 2021 ते 1 जून 2021 या काळात मुलाखतीस येऊ शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 139 पदे भरती केली जातील. नोटिफिकेशनद्वारे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव आणि पगाराची माहिती मिळू शकेल. (PCMC recruitment-2021 junior resident posts download notification at pcmcindia.gov.in)

हेही वाचा: SBI Clerk Admit Card : पीईटीसाठी 26 मे, प्रिलिम्ससाठी 1 जूनपासून करा डाउनलोड

या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार 25 मे 2021 ते 1 जून 2021 पर्यंत मुलाखतीत भाग घेऊ शकतात. अधिकृत अधिसूचनेनुसार एकूण रिक्त जागांची संख्या 139 आहे. त्यापैकी सिनिअर रेसिडेंटची 61 पदे, ज्युनिअर रेसिडेंटची Junior resident) 63 पदे आणि मेडिकल ऑफिसरची (Medical officer) 15 पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा: AIMA MAT : इंटरनेट आधारित टेस्टच्या रजिस्ट्रेशनसाठी दोनच दिवस मुदत

या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात MBBS / BDS / MBBS + Diploma / MD / MS / DNB पदवी आणि इतर विहित पात्रता असणे आवश्‍यक आहे. शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

सिनिअर रेसिडेंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 65,000 रुपये (senior resident salary in PCMC), ज्युनिअर रेसिडेंट पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 55,000 रुपये आणि मेडिकल ऑफिसरसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 75,000 रुपये वेतन दिले जाईल.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवार त्यांच्या कागदपत्रांसह 25 मे 2021 ते 1 जून 2021 या कालावधीत पिंपरी चिंचवड महानगरपालिका, यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पुणे येथे मुलाखतीस येऊ शकतात.