औषधनिर्माणशास्राची प्रवेश प्रक्रिया सूरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधनिर्माणशास्राची प्रवेश प्रक्रिया सूरू

औषधनिर्माणशास्राची प्रवेश प्रक्रिया सूरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुमचा पाल्य जर औषधनिर्माणशास्राला प्रवेश घेऊ इच्छित असेल, तर त्याच्यासाठी हा संपूर्ण महिना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राज्यातील औषधनिर्माण शास्त्राच्या बी.फार्म आणि डी.फार्म अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना रविवार (ता.२१) पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली असून, २४ नोव्हेंबरला प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ६ डिसेंबरला महाविद्यालये सुरू केले जातील, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) देण्यात आली आहे.

हेही वाचा: "१९४७ मध्ये मोदींसारखं नेतृत्व असतं तर भारत सर्वाधिक समृद्ध असता"

राज्याच्या सीईटी-सेलवर प्रवेशप्रक्रीयेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला असून, यंदा प्रवेशाची संख्याही वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. २९ नोव्हेंबर पर्यंत प्रवेशाच्या पहिल्या फेरीस सुरवात होणार आहे. तर २३ डिसेंबर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पर्सेंटाईलनुसार आणि महाविद्यालयांच्या कटऑफ नुसार प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

हेही वाचा: त्रिपुराबाबतच्या फेक न्यूजमुळं अमरावतीत हिंसाचार - केंद्रीय गृह मंत्रालय

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

https://ph2021.mahacet.org/StaticPages/HomePage

महत्त्वाच्या तारखा :

 • अर्ज भरण्याची मुदत : १ नोव्हेंबर पर्यंत (संध्याकाळी पाच)

 • कागदपत्रांची तपासणीची मुदत : २ नोव्हेंबर पर्यंत

 • प्राथमिक गुणवत्ता यादी : ४ नोव्हेंबर

 • गुणवत्ता यादीतील आक्षेप : २५ ते २७ नोव्हेंबर

 • रिक्त जागांचा तपशील : २८ नोव्हेंबर

 • पहिल्या फेरीतील प्राधान्यक्रम भरणे : २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर

 • पहिली फेरी जाहीर : ३ डिसेंबर

 • एआरसी केंद्रावर जाऊन प्रवेश निश्चित करणे : ४ ते ६ डिसेंबर

 • दुसऱ्या फेरीतील प्राधान्यक्रम भरणे : ८ ते १० डिसेंबर

 • गुणवत्ता यादी जाहीर करणे : १२डिसेंबर

 • महाविद्यालयानूसार रिक्त जागांना प्रवेश : १६ ते २३ डिसेंबर

 • शैक्षणिक वर्षाला सुरवात : ६ डिसेंबर

loading image
go to top