नव्या ज्ञानाच्या निर्मीतीसाठी...

प्रा. संजीव सोनवणे
Thursday, 2 January 2020

वाटा करिअरच्या
मानव ज्या जगात वास्तव्य करतो, ते जग समजून घेऊन त्याचा विकास करण्याच्या क्षमता शिक्षणाद्वारे प्राप्त केल्या जातात. समस्यामुक्त, वादविवाद विरहित जगाची निर्मिती मोठे आव्हान आहे. समस्यांचे सर्वसंमत समाधान शोधणे गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. समस्या म्हणजे अपेक्षा व वस्तुस्थिती यातील तफावत होय. ही तफावत ज्ञाननिर्मिती करून, तिचे समर्पक उपयोजन करून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकाच विषयाच्या शिक्षणातून समस्यांची उत्तरे शोधण्यावर  मर्यादा येतात. त्यामुळेच जगभरात आंतरविद्याशाखा अभ्यासक्रमांना विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व एकविसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रमात बदल तसेच, नव्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश विद्यापीठामध्ये करण्यात येऊ लागला. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१७ मध्ये, तर स्वतंत्र विद्याशाखा नव्याने निर्माण करण्यात आली. देशाच्या नव्या शिक्षण धोरणाच्या मसुद्यामध्ये एकल किंवा स्वतंत्र विद्याशाखा व विद्यापीठांऐवजी आंतरविद्याशाखा अभ्यासाची जोरदार शिफारस करण्यात आली आहे.

हेही वाचा : मुलांनो 2020 आलंय; करिअर घडविण्यासाठी हे कराच!

आंतरविद्याशाखा अभ्यास संकल्पना नवी नसली, तरी बदलत्या जगाच्या वास्तव समस्यांच्या अभ्यासासाठी तिला महत्त्व प्राप्त झाले आहे. आंतरविद्याशाखा अभ्यासामुळे समस्यांची उत्तरे शोधण्याची गरज असणाऱ्या शाखांचा अभ्यास करण्याची क्षमता विकसित होते. विविध विषयांत नव्या ज्ञानाची निर्मिती करता येते. भविष्यात तंत्रज्ञानाचा, अवकाश विज्ञानाचा व विशेष करून स्वयंचलित यंत्राचा वापर वाढणार आहे. त्यासाठी आंतरविद्याशाखीय ज्ञानक्षेत्रांची दालने विद्यार्थ्यांची वाट पाहत आहेत. या नव्या ज्ञानक्षेत्रांमध्ये लीलया वावरण्यासाठी, ती विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सिद्ध व्हावे लागेल, तरच देश आर्थिक सत्ता होऊ शकेल. 

हेही वाचा : अमेरिकेत शिकायला घाबरू नका, या आहेत ईझी स्टेप्स

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास विभागाचे अधिष्ठाता आहेत)
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prof. sanjeev sonawane article careers