

Indian Railways recruitment
ESakal
देशातील सरकारी क्षेत्रातील सर्वात मोठी रोजगार देणारी संस्था असलेल्या रेल्वेमधील नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळ देशभरातील १७ रेल्वे झोनमध्ये एकूण ११,१२७ पदांसाठी भरती करत आहे. रेल्वे मंत्रालयाने या भव्य भरतीला आधीच मंजुरी दिली आहे.रेल्वे भरती मंडळाने (आरआरबी) सहाय्यक लोको पायलट (एएलपी) भरती २०२६-२७ साठी एक संक्षिप्त अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण ११,१२७ पदे भरली जाणार आहेत.