खुशखबर! DFCCIL कंपनीत तब्बल 1074 पदांसाठी भरती; आजच करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DFCCIL Application

खुशखबर! DFCCIL कंपनीत तब्बल 1074 पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

DFCCIL Application 2021 : रेल्वे मंत्रालयांतर्गत सरकारी कंपनीत (पीएसयू) नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी ही आहे कामाची बातमी! डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (DFCCIL) या रेल्वे मंत्रालयाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने 1074 कनिष्ठ कार्यकारी, कार्यकारी आणि कनिष्ठ व्यवस्थापक यांच्या विविध विभागांतील पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दोन महिन्यांसाठी वाढविली आहे. कंपनीने मंगळवार 18 रोजी जाहीर केलेल्या नोटिसीनुसार, या पदांचे उमेदवार आता 23 जुलै 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मे निश्चित करण्यात आली होती. दरम्यान, डीएफसीसीआयएलच्या अर्जाची प्रक्रिया 24 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आहे. (Recruitment For 1074 Posts In DFCCIL Company)

डीएफसीसीआयएलने जाहीर केलेल्या नोटिसीनुसार, देशभरात पसरलेल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या पदांसाठी मुदत वाढ दिली आहे. तसेच, देशाच्या विविध भागात लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर, अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याचबरोबर डीएफसीसीआयएलने सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2021 मध्ये घेण्यात येणारी संगणक आधारित चाचणी (सीबीटी) घेण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी ही परीक्षा जून महिन्यात घेण्यात येणार होती.

हेही वाचा: UGC NET परीक्षेची लवकरच घोषणा; तारखाही होणार जाहीर?

या पदांसाठी होणार भरती

 • कनिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) - 31 पदे

 • कनिष्ठ व्यवस्थापक (ऑपरेशन्स आणि बीडी) - 77 पदे

 • कनिष्ठ व्यवस्थापक (मेकॅनिकल) - 3 पदे

 • कार्यकारी (सिव्हिल) - 73 पदे

 • कार्यकारी (इलेक्ट्रिकल) - 42 पदे

 • कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) - 87 पदे

 • कार्यकारी (ऑपरेशन्स आणि बीडी) - 237 पदे

 • कार्यकारी (यांत्रिकी) - 3 पदे

 • कनिष्ठ कार्यकारी (विद्युत) - 135 पदे

 • कनिष्ठ कार्यकारी (सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन) - 147 पदे

 • कनिष्ठ कार्यकारी (ऑपरेशन्स आणि बीडी) - 225 पदे

 • कनिष्ठ कार्यकारी (यांत्रिकी) - 14 पदे

Recruitment For 1074 Posts In DFCCIL Company

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top