esakal | Jobs : ONGC मध्ये निघाली ग्रॅज्युएट ट्रेनी पदांसाठी भरती! 1 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

ONGC

ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ओएनजीसी) मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

ONGC मध्ये निघाली ग्रॅज्युएट ट्रेनी भरती! 1 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (Oil and Natural Gas Corporation - ONGC) मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी (Recruitment) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या अंतर्गत एकूण 309 पदांची भरती केली जाईल. जे उमेदवार या पदासाठी अर्ज करू इच्छितात ते अधिकृत वेबसाइट www.ongcindia.com वर अधिसूचना तपासून अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 1 नोव्हेंबर 2021 आहे. ओएनजीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अभियांत्रिकी आणि भूविज्ञान विषयातील गेट 2021 स्कोअरद्वारे अर्ज करू शकतात.

हेही वाचा: दक्षिण मध्य रेल्वेमध्ये मेकॅनिक व कारपेंटर पदांची भरती!

अर्जासाठी शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य / ईडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 300 रुपये असेल. तर अनुसूचित जाती/ जमाती/ पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी माफ आहे.

वयोमर्यादा

अनारक्षित आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील एईई (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) वगळता सर्व पदांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे, तर एईई (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे आहे. तसेच, ओबीसी (नॉन-क्रीमीलेयर) साठी वयोमर्यादा 33 वर्षे आणि एईई वगळता सर्व पदांसाठी (ड्रिलिंग आणि सिमेंटिंग) पदासाठी 31 वर्षे आहे.

हेही वाचा: अणुऊर्जा विभागात विविध पदांसाठी थेट भरती! 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

असा करा ऑनलाइन अर्ज

पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी ऑनलाइन अर्ज इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ओएनजीसीची अधिकृत वेबसाईट www.ongcindia.com वर भेट द्यावी. त्यानंतर करिअर टॅबवर क्‍लिक करा. त्यानंतर 'GATE 2021 स्कोअरद्वारे अभियांत्रिकी आणि भूविज्ञान विषयांमध्ये जीटीची भरती, नवीन अर्जदार' या लिंकवर क्‍लिक करा. GATE 2021 नोंदणी क्रमांक आणि मेल आयडी प्रविष्ट करा. त्यानंतर फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा. आता अर्ज फी भरा. यानंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याकडे ठेवा.

loading image
go to top