Engineering Jobs : १ लाख पगार मिळवण्याची अभियंत्यांना संधी; या विभागात भरती सुरू

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
Engineering Jobs
Engineering Jobsgoogle

मुंबई : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) कनिष्ठ कार्यकारी पदांवर भरती सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण ५९६ पदे भरली जातील. जे उमेदवार या पदांसाठी इच्छुक आणि पात्र आहेत, त्यांनी www.aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा. अर्ज भरण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी २०२३ आहे. हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - ५९६

कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी- सिव्हिल)

कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल)

कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स)

कनिष्ठ कार्यकारी (स्थापत्य)

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - २२ डिसेंबर २०२२

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २१ जानेवारी २०२३

Engineering Jobs
अभियंता आणि आर्किटेक्ट यांना बीएसएफमध्ये सेवेची संधी

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे ठेवण्यात आली आहे. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

Engineering Jobs
Recruitment : कोचिन शिपयार्डमध्ये अभियंत्यांची भरती; त्वरीत करा अर्ज

अर्ज शुल्क

कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० रुपये भरावे लागतील, तर SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

पगार

निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० रुपये ते १,४०,००० रुपये वेतन दिले जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com