AMUL: 'अमूल'मध्ये काम करण्याची चालून आली आहे सुवर्णसंधी

इच्छुक उमेदवार careers.amul.com यावर अर्ज करू शकतात.
AMUL
AMULgoogle

मुंबई : 'आनंद मिल्क युनियन लिमिटेड' (AMUL) या कंपनीत साहाय्यक लेखापाल (accounts assistant) या पदासाठी भरती सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार careers.amul.com यावर अर्ज करू शकतात.

AMUL
Khalia Bhatter? 'गंगुबाई काठियावाडी'चं अमूल स्टाईलने कौतुक

अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेतील पूर्णवेळ अभ्यासक्रमाचा प्रथम श्रेणीतील पदवीधर असावा. तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रमातील दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी किंवा वाणिज्य शाखेची प्रथम श्रेणीतील पदव्युत्तर पदवी असावी. १ ते २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. वयाची मर्यादा २८ वर्षे आहे. निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती विजयवाडा येथे केली जाईल.

निवड झालेल्या उमेदवाराला ४ लाख ५० हजार ते ४ लाख ७५ हजार इतके वार्षिक वेतन दिले जाईल. Financial accounting, commercial norms & taxation यांतील कामाचा अनुभव व संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. SAPच्या ज्ञान असल्यास प्राधान्य दिले जाईल.

AMUL
'अमूल' ला मदत करण्यासाठी 'गोकुळ' ला मोठे होऊ दिले नाही

Accounting documents such as Invoices, billing, Accounts payable, Accounts Receivable, Purchases, Bank reconciliations, verification of payments, MIS, Maintenance of records, इत्यादी तयार करण्याची जबाबदारी साहाय्यक लेखापालावर असेल. तसेच त्याला वस्तू व सेवा कराचे (GST) चांगले ज्ञान असणे व GST returns filing करता येणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com