esakal | Jobs : रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या विविध 4103 पदांची भरती! दहावी, आयटीआय उमेदवारांना संधी
sakal

बोलून बातमी शोधा

Railway jobs

दक्षिण मध्य रेल्वेने (SCR) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

Jobs : रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या विविध 4103 पदांची भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : दक्षिण मध्य रेल्वेने (South Central Railway - SCR) अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत एसी मेकॅनिक, सुतार, डिझेल मेकॅनिक, इलेक्‍ट्रिशियन आणि इतर ट्रेडच्या एकूण 4103 रिक्त जागा विविध युनिटमध्ये भरल्या जाणार आहेत. 4 ऑक्‍टोबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर 2021 आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. वेबसाइटवर ऑनलाइन अर्जाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रेणीनिहाय रिक्त पदांचा तपशीलही अधिसूचनेमध्ये उपलब्ध आहे.

हेही वाचा: विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती!

ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील

 • एसी मेकॅनिक : 250 पदे

 • सुतार : 18 पदे

 • डिझेल मेकॅनिक : 531 पदे

 • इलेक्‍ट्रिशियन : 1019 पदे

 • फिटर : 1460 पदे

 • इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक : 92 पदे

 • मशिनिस्ट : 71 पदे

 • MMTM : 5 पदे

 • MMW : 24 पदे

 • पेंटर : 80 पदे

 • वेल्डर : 553 पदे

जाणून घ्या कोण अर्ज करू शकतात...

रेल्वेमधील अप्रेंटिस पदांसाठी हे उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डाकडून किमान 50 टक्के गुणांसह दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याव्यतिरिक्त संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्‍यक आहे. उमेदवाराचे वय 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 4 ऑक्‍टोबर 2021 नुसार वयाची गणना केली जाईल. दुसरीकडे, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल. पात्रता निकषांवरील तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिसूचना तपासू शकतात.

अशी होईल निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे. निवड प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

हेही वाचा: Jobs : FSSAI मध्ये ग्रुप ए आणि इतर पदांची थेट भरती!

येथे करा ऑनलाईन अर्ज

उमेदवार scr.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर उपलब्ध अप्रेंटिस प्रशिक्षण 2021 च्या ऑनलाइन अर्ज लिंकद्वारे अर्ज करू शकतात.

loading image
go to top