Jobs : NIT मध्ये प्राध्यापक पदांची भरती! ऑनलाइन मुलाखतीद्वारे निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NIT मध्ये प्राध्यापक पदांची भरती! ऑनलाइन मुलाखतीद्वारे निवड
NIT मध्ये प्राध्यापक पदांची भरती! ऑनलाइन मुलाखतीद्वारे निवड

NIT मध्ये प्राध्यापक पदांची भरती! ऑनलाइन मुलाखतीद्वारे निवड

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, एनआयटी तिरुचिरापल्ली (National Institute of Technology, NIT Tiruchirappalli) यांनी प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत, या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार NITT च्या अधिकृत साइट nitt.edu वर संपूर्ण तपशील जाणून घेऊ शकतात. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 2 जानेवारी 2022 रोजी सुरू झाली असून 16 जानेवारी 2022 पर्यंत चालेल. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, ते या कालावधीत अर्ज करू शकतात. शेवटच्या तारखेनंतर कोणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. या भरती मोहिमेद्वारे 22 पदांवर भरती केली जाणार आहे. (Recruitment of professors in NIT through online interview)

हेही वाचा: शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! 2013 पासूनच्या 'TET'ची होणार पडताळणी

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, NIT तिरुचिरापल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील प्रथम श्रेणीची पीएचडी (PhD) पदवी असणे आवश्‍यक आहे. याशिवाय, अभियांत्रिकी श्रेणीसाठी B.E. / B.Tech, M.E. / M.Tech पदवी देखील 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी. त्याचप्रमाणे सायन्स, कॉम्प्युटर ऍप्लिकेशनसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे B.A. / B.Sc. / B.Com. / BCA, M.A. / M.Sc./ M.Com. / MCA ची पदवी असावी.

उमेदवारांनी नोंद घ्यावी, की ऑनलाइन अर्ज भरणे, अपलोड करणे आणि सबमिट करणे पूर्ण झाल्यानंतर अर्जाची एक प्रत डाउनलोड करावी. त्यावर स्वाक्षरी करावी व त्यानंतर परिशिष्ट I आणि II सोबत प्रमाणपत्रे / प्रशंसापत्रे /संशोधनपत्र आदींच्या स्वयं-प्रमाणित फोटोकॉपी जोडून स्पीड पोस्टद्वारे रजिस्ट्रार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी, तिरुचिरापल्ली - 620015, तमिळनाडू (Tamilnadu) यांना प्रथम पाठवा. उमेदवारांनी नोंद घ्यावी, की अर्जाची प्रत 19 जानेवारी 2022 रोजी किंवा त्यापूर्वी संस्थेकडे पोहोचली पाहिजे.

हेही वाचा: सेबी यंग प्रोफेशनल प्रोग्राममध्ये नोकऱ्या! पगार 60 हजार

अशी होईल निवड

शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीची तारीख संस्थेच्या वेबसाइटवर कळवली जाईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top