न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती!

न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये ट्रेड अप्रेंटिस पदांची भरती

सोलापूर : न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Nuclear Power Corporation of India) (NPCIL) ने ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत फिटर, टर्नर, मशिनिस्ट, इलेक्‍ट्रिशियन, इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिक, वेल्डर आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट या पदांसाठी नेमणुका केल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार एनपीसीआयएल अप्रेंटिस भरती 2021 साठी अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 25 ऑगस्टपासून सुरू झाली आहे आणि 13 सप्टेंबर 2021 पर्यंत चालणार आहे. उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

हेही वाचा: दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरी! पोस्ट विभागात ड्रायव्हर पदाची भरती

न्यूक्‍लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार फिटर 30, टर्नर 04 आणि मशिनिस्ट 04 या पदांवर भरती केली जाईल. तसेच, इलेक्‍ट्रिशियनच्या 30 आणि इलेक्‍ट्रॉनिक मेकॅनिकच्या 30 पदांची भरती केली जाईल. त्याचबरोबर वेल्डरची 04 पदे आणि कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंटची 05 पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांवर भरती

ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी करा असा ऑनलाइन अर्ज

ट्रेड अप्रेंटिसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा वेब पोर्टल http://www.apprenticeship.org/ किंवा www.apprenticeship.gov.in वर स्वतःची नोंदणी करावी. यानंतर तुम्हाला संबंधित ट्रेडच्या माध्यमातून अर्ज करावा लागेल.

ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे कमाल वय 24 वर्षांपेक्षा जास्त असावे. पदांशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

loading image
go to top