esakal | UPSC मध्ये डेप्युटी डायरेक्‍टर, असिस्टंट कीपर पदांची भरती! अर्ज करण्याचा उद्या शेवट दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC Recruitment

UPSC मध्ये डेप्युटी डायरेक्‍टर, असिस्टंट कीपर पदांची भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

केंद्रीय लोकसेवा आयोगाने काढलेले असिस्टंट कीपर, प्राचार्य, उपसंचालक आणि मत्स्य संशोधन चौकशी अधिकारी यासह इतर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे.

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) काढलेले असिस्टंट कीपर, प्राचार्य, उपसंचालक आणि मत्स्य संशोधन चौकशी अधिकारी यासह इतर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. यूपीएससी या पदांसाठी नोंदणीची विंडो उद्या म्हणजेच 2 सप्टेंबर 2021 रोजी बंद करेल. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइट @upsc.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

यूपीएससीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation), कामगार आणि रोजगार मंत्रालयात (Ministry of Labor and Employment) उपसंचालकांची 151 पदे भरली जातील. या व्यतिरिक्त मत्स्यव्यवसाय (Fisheries), पशुसंवर्धन (Animal Husbandry), दुग्धव्यवसायसाठी (Dairying) एक आणि मुख्य अधिकारीसाठी एक पद भरले जाईल. या पदांसाठीची भरती अधिसूचना 13 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर करण्यात आली होती. आता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2021 आहे.

हेही वाचा: युनियन बॅंकेत सरकारी नोकरीची संधी! 3 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी https://www.upsc.gov.in/hi या थेट लिंकवर क्‍लिक करा

हेही वाचा: भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट इंडस्ट्रियल ट्रेनी भरती!

वयोमार्यादा

कर्मचारी राज्य विमा महामंडळ, श्रम आणि रोजगार मंत्रालयात उपसंचालक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षे असावे. असिस्टंट कीपर पदासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षे असावे. याशिवाय SC, ST आणि OBC साठी कमाल वय 33 वर्षे असावे. त्याचबरोबर प्रधान अधिकारी अभियांत्रिकी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 50 वर्षे असावे. याशिवाय आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सूट देण्यात येईल. याशिवाय, उपसंचालक, असिस्टंट कीपर, प्राचार्य आणि मत्स्य संशोधन अधिकारी या पदांशी संबंधित शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. ऑनलाइन अर्ज करताना, सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यात उपस्थित असलेल्या अटींच्या आधारेच अर्ज करा. जर अर्ज नियमांचे पालन केले नाही तर उमेदवारांचे फॉर्म नाकारले जाऊ शकतात. त्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

loading image
go to top