esakal | प्रशासकीय पदांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये भरती! 30 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासकीय पदांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये भरती!

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) मध्य प्रदेश (MP) ने विविध प्रशासकीय पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

प्रशासकीय पदांसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमध्ये भरती!

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (NID) (National Institute of Design) मध्य प्रदेश (MP) ने विविध प्रशासकीय पदांसाठी अर्ज मागवले आहेत. संस्थेने नुकत्याच जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, सहाय्यक (लेखा / प्रशासन / ग्रंथालय) आणि इतर विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार 'एनआयडी'च्या अधिकृत वेबसाइट nidmp.ac.in वर उपलब्ध ऑनलाइन अर्ज भरून अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे.

हेही वाचा: PFRDA भरती 2021 : सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

उमेदवारांनी लक्षात घ्यावे, की ऑनलाइन अर्ज प्रक्रियेअंतर्गत त्यांना उपनिबंधक, प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ लेखा अधिकारी पदांसाठी विहित केलेले 500 रुपये विहित शुल्क देखील भरावे लागेल. त्याचवेळी उर्वरित इतर पदांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये आहे. तसेच एससी, एसटी, दिव्यांग, माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क जमा करण्याची गरज नाही. अर्जाच्या वेळी ऑनलाइन पद्धतीने अर्ज फी भरता येईल.

रिक्त पदांची संख्या

 • उपनिबंधक : 01

 • प्रशासकीय अधिकारी : 01

 • वरिष्ठ लेखा अधिकारी : 01

 • प्रमुख सुरक्षा सेवा : 01

 • वरिष्ठ सहाय्यक ग्रंथपाल : 01

 • वरिष्ठ अधीक्षक (लेखा) : 01

 • सहाय्यक प्रशासकीय अधिकारी : 02

 • अधीक्षक : 02

 • वरिष्ठ सहाय्यक (प्रशासन/स्टुडिओ) : 02

 • सहाय्यक (लेखा/प्रशासन/ग्रंथालय) : 05

 • लेडी वॉर्डन : 01

हेही वाचा: केंद्रीय विद्यापीठांमध्ये सहा हजारांहून अधिक शिक्षकांची होणार भरती

जाणून घ्या पात्रता

सहाय्यक (लेखा/प्रशासन/ग्रंथालय), लेडी वॉर्डन, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून बॅचलर पदवी आणि संगणकाचे ज्ञान असणारा असावा. शैक्षणिक पात्रता आणि इतर पदांसाठी तसेच आवश्‍यक इतर निकषांसाठी भरती अधिसूचना पाहा.

loading image
go to top