कर्नाटकातील SSLC परीक्षेचा निकाल जाहीर; बेळगाव, चिक्कोडीचा 'ए' ग्रेडमध्ये समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SSLC Results

कर्नाटकातील एसएसएलसी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.

कर्नाटकातील SSLC परीक्षेचा निकाल जाहीर; बेळगावचा 'ए' ग्रेडमध्ये समावेश

बंगळूरु : कर्नाटक राज्यातील एसएसएलसी परीक्षेचा (SSLC Exam) निकाल आज जाहीर झाला असून संपूर्ण राज्याचा निकाल 85.53 टक्के लागला आहे. शिक्षणमंत्री बी. सी. नागेश (Minister of Education B. C. Nagesh) यांनी बंगळूरु (Bangalore) इथं पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केलाय.

दरम्यान, राज्यातील एकूण 8 लाख 53 हजार 436 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामधील 7 लाख 70 हजार 81 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 3 लाख 58 हजार 602 विद्यार्थी, तर तीन लाख 72 हजार 179 विद्यार्थिनींचा समावेश आहे.

हेही वाचा: 'हे' दोन पदार्थ खाल्ल्यामुळं 128 वर्षीय महिलेला मिळालं 'दीर्घायुष्य'

एकूण 81.30 टक्के विद्यार्थी तर 90.29 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. या निकालात बेळगाव (Belgaum) आणि चिकोडी जिल्ह्याचा 'ए' ग्रेड मध्ये समावेश आहे. राज्यात 145 विद्यार्थ्यांनी 625 पैकी 625 गुण प्राप्त केले आहेत.

Web Title: Results Of Sslc Exam In Karnataka Announced Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnatakabelgaumbangalore
go to top