RRC Recruitment 2020: रेल्वेमध्ये १००४ पदांची भरती; असा करा अर्ज

Railway
Railway

RRC Recruitment 2020: नवी दिल्ली : रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (आरआरसी) अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. याबाबत त्यांनी अधिसूचनाही जारी केली आहे. ही भरती दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार rrchubli.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. 

उमेदवारांना 9 जानेवारी पर्यंत अर्ज करता येतील. एकूण पदांची संख्या १००4 असून त्यापैकी २८७ पदे हुबळी विभागात, २८० बेंगळुरू, २१७ पदे कॅरेज रिपेयर वर्कशॉप हुबळी, १७७ पदे म्हैसूर आणि ४३ पदे सेंट्रल वर्कशॉप म्हैसूरमध्ये भरण्यात येणार आहेत. 

शैक्षणिक पात्रता- 
या पदांवर भरतीसाठी गुणवत्ता यादी आठवी आणि दहावीतील उत्तीर्ण गुण तसेच आयटीआयमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल. उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षांदरम्यान असावे. या पदांवर थेट भरती होईल. म्हणजेच उमेदवारांना परीक्षा आणि मुलाखत देण्याची गरज नाही. 

सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी भरावी लागणार आहे. तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. अर्ज करण्यासाठी उमेदवार वेबसाइटला भेट देऊ शकतात. त्याची लिंक खाली देण्यात आली आहे. 

- अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आणखी एक संधी चालून आली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL)नेही अनेक पदांसाठी भरती काढली आहे. यंग प्रोफेशनल्ससाठी आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण सात पदे भरली जातील. यापैकी ५ पदे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी मॅनेजमेंट ग्रुपमध्ये असून एक पद कॉर्पोरेट फायनान्स ग्रुपमध्ये आहे, तर आणखी एक पद कॉर्पोरेट एचआर ग्रुपमध्ये आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.bhel.com किंवा www.careers.bhel.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com