खेळाडूंसाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती; पगार २ लाखांपर्यंत!

SAI
SAI

Govt Jobs : SAI Recruitment 2021: पुणे : भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) विविध प्रशिक्षकांच्या सुमारे १०५ जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडूदेखील यासाठी अर्ज करू शकतात. 

'साई'ने असिस्टंट कोच, कोच, सीनिअर कोच आणि चीफ कोच यांच्या १०५ जागांसाठी भरती करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतेही अर्जासाठीचे शुल्क भरावे लागणार नाही. मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. 

पदांचा तपशील पुढीलप्रमाणे - 
१. असिस्टंट कोच - ३५
२. कोच - ३५
३. सीनिअर कोच - २५
४. चीफ कोच - १०

वेतनमान - 
असिस्टंट कोच - ३५,४०० ते १,१२,४०० रुपये
कोच - ५६,१०० ते १,७७,५०० रुपये
सीनिअर कोच - ६७,७०० ते २,०८,७०० रुपये
चीफ कोच - ७८,८०० ते २,०९,२०० रुपये

योग्यता 
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया किंवा नेता सुभाष नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोचिंगमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. ऑलिंपिक / पॅरालिंपिकमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडूदेखील अर्ज करू शकतात. तसेच द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त व्यक्तीही यासाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ५६ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल.

असा करा अर्ज 
साईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिसूचना डाऊनलोड करून घ्या. अधिसूचना सविस्तर वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. तसेच ती भरून आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स सोबत जोडाव्यात आणि अर्ज अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावा.

अधिसूचना पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा
अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com