AISSMS ची उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात दर्जेदार शिक्षणाची पंरपरा

AISSMS ची उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात दर्जेदार शिक्षणाची पंरपरा
Summary

AISSMS नव्या ट्रेंडनुसार प्रशिक्षणासाठी आतंरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य घेते. यामध्ये जागतिक दर्जाच्या संस्थांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था असतात.

एखाद्या संस्थेचा रचनात्मक आणि सर्जनशील विकास साधायचा असेल, तर आदर्श मूल्यांसोबत संस्थेची आदर्श तत्वे जोपासणारी विचारधारा देखील तितकीच आवश्‍यक असते. पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी या संस्थेच्या यशस्वी वाटचालीमध्ये त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ आणि बहुजन समाजाचे हित आणि उन्नती साधण्यासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थेची स्थापन केली. ‘दर्जेदार शिक्षणाद्वारे समाजाची सेवा’ हे घोषवाक्‍य या संस्थेने कायम पाळले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९१७ साली स्थापन केलेल्या या संस्थेद्वारे १९३२ सालापासून शिक्षणाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. छत्रपती शाहू महाराजांनी रुजवलेल्या संस्कृती, मूल्य आणि नैतिकतेच्या संस्कारांनी मूल्यवर्धित दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा संकल्प आजही कायम आहे.

1992 मध्ये AISSMS ने उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. तेव्हापासून गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असं शिक्षणाला AISSMS ने प्राधान्य दिलं आहे. AISSMS ची देखरेख करण्यासाठी अध्यक्ष आणि स्वतंत्र विश्वस्त मंडळ आहे. यामध्ये शासकीय आणि धोरण ठरवणारे लोक असतात. सोसायटीचं कामकाज पाहण्यासाठी कॅबिनेट आहे. तसंच सल्लागार समितीचे मानद सचिव श्री मालोजीराजे छत्रपती हे आहेत. श्री मालोजीराजे छत्रपती यांनी संस्थेच्या कामाबद्दल म्हटलं की, 'आम्ही संपूर्ण संघटनेचं काम व्यवस्थितपणे पार पाडत आहे. तसेच AISSMS ला आणखी वरच्या पातळीवर घेऊन जाण्याचं स्वप्न पूर्ण केलं जात आहे.' संस्थेत आज १ हजार २०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून, १४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

भारताच्या प्रगतीच्या चक्राला गती देताना शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीबरोबर आपल्याला नैतिक मूल्य, संस्कृती, ज्ञान आणि अभिमान याचा योग्य समन्वय हवा. दर्जेदार शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य भर झटणारा सर्वात महत्त्वाचा घटक शिक्षक असतो, याचा आम्हाला अभिमान आहे. AISSMS बोधवाक्याप्रमाणे व्यक्तींना घडवते जे त्यांच्या संस्थेचा एक अमूल्य असा भाग तर आहेतच शिवाय समाजातील एक जबाबदार असा नागरिकसुद्धा आहेत. याची जाणीव ठेवूनच आमचे सर्व प्रयत्न हे अशा नागरिकांना घडवण्याचे आहेत जे जबाबदार, कायद्याचे पालन करणारे आणि देशासाठी काम करतील. हे आमच्या मिलिटरी स्कूलच्या शिस्तीचा आणि इंजिनिअरिंग, आयटी आणि इतर प्रमुख संस्थांचा भागच आहे. भारताच्या इतिहासाचं सुवर्ण पान भविष्याच्या हाती सुरक्षितपणे देणं हेच संस्थेचं उद्दिष्ट आहे. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीला 95 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. याकाळात AISSMS ने अनेक टप्पे पार करताना परंपरा निर्माण केली आहे.

AISSMS ही एक एज्युकेशनल सोसायटी असून या ठिकाणी विविध प्रोग्रॅम, विभाग, शाळा, केंद्र आणि इतर संस्था आहे. प्री प्रायमरी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडीपर्यंतचं शिक्षण देताना सर्व संस्थांचा सर्वांगीण विकास करण्याकडे लक्ष असतं. यात निवासी शाळा, डे स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयेसुद्धा आहेत. याठिकाणी अकॅडमिक आणि व्होकेशनल असे विद्यार्थी आहेत. AISSMS नव्या ट्रेंडनुसार प्रशिक्षणासाठी आतंरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य घेते. यामध्ये जागतिक दर्जाच्या संस्थांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था असतात.

सर्वांगीण असं शिक्षण देण्याची परंपरा लक्षात घेऊन पॉलिटेक्निक वगळता इतर सर्व संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिलं जातं. तसंच हे सर्व कोर्स पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. शिक्षणाच्या दर्जाला प्राधान्य दिलं असून सर्व महाविद्यालयांना राष्ट्रीय मान्यता मंडळाची मान्यता मिळाली आहे. तसंच जगभरातील अनेक विद्यापीठांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. AISSMS कडे जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आवश्यक अशी व्यवस्था आहे. अत्याधुनिक आणि पायाभूत अशा सुविधा संशोधनासाठी पुरवल्यानं अभ्यासासाठी पोषक असं वातावरण आहे.

सर्वांगीण विकास हेच AISSMS चे ध्येय असून यासाठी संस्था दरवर्षी प्रयत्नशील असते. वर्षानुवर्षे संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रात अव्वल असे खेळाडू विद्यापीठात घडतात. तसंच यशस्वी विद्यार्थी हे जगभरात त्यांची वेगळी ओळख निर्माण करत असून त्यांनी आतापर्यंत अनेक पुरस्कार जिंकले आहेत. AISSMS मधील सर्व प्रमुख संस्था आता वेगाने वाढत आहेत. संस्थेकडून सर्वोत्तम देण्यासाठी नेहमीच अभ्यासपूर्ण असे प्रयत्न करण्यात आले आहेत. कष्टाळू आणि आपल्या ध्येयाबाबत जागरूक असणाऱ्या विद्यार्थ्यांना या संस्थेने काय पाठबळ दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथेजाणीवपूर्वक काही प्रयत्न केलेजातात. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबरोबरच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात देखील त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेने कायम विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत.

मानाचा शिरपेच

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग या महाविद्यालयास उत्कृष्ट व्यावसायिक महाविद्यालय (शहरी विभाग) असे पारितोषीक सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठ, पुणेकडून प्राप्त झालेले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बोरमने यांचा सीएसआय मुंबई टेक नेक्स्ट इंडियातर्फे उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरव.

आजरोजपर्यंत ६४५ युनिर्वसिटी रॅकर्स, २१ सुवर्ण पदक विजेते आहेत. तसेच गेल्या पाच वर्षातील १८० आहेत. महाविद्यालयाच्या हृदयम या मॅगॅझीनला झी मराठी दिशा -२०१७ तर्फेव्दितीय राज्य स्तरीय पारितोषीक मिळालेले आहे.

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे, इन्स्टिटयूट ऑफ इंर्फरमेश टेक्नॉलॉजी या महाविद्यालयास २०१७ या वर्षाचे उत्कृष्ट खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे विभाग) असे पारितोषीक FSAI कडून प्राप्त झालेले आहे. या महाविद्यालयास उत्कृष्ट खाजगी महाविद्यालय असे पारितोषीक ISTE, New Delhi कडून प्राप्त झालेलेआहे.

ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे, कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी या महाविद्यालयास इंडिया टुडे मँगेझीन सर्वे २०२० मध्ये पश्चिम विभागातून तृतीय क्रमांक तर ऑल इंडीया स्तरावर खाजगी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज या श्रेणीत आठवा क्रमांक मिळविलेला आहे.

महाविद्यालयाने अँथलोन इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी, आर्यलंड यांच्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे. बेस्ट प्रिन्सिपल अवार्ड डॉ. पी बी माने यांचा उत्कृष्ट प्राचार्य म्हणून गौरव. डॉ सोनाली जाधव (WOW BE Publication India), डॉ माडगूळकर - प्राचार्य ए आय एस एस एम एस फार्मसी (ए पी टी आय) ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे, इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांचे मान्यताप्राप्त पी. एच. डी. संशोधन केंद्र आहे.

सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत आयोजन केले आहे. यामध्ये AISSMS सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन करणार आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 मध्ये मोफत नोंदणीसाठी www.sakalexpo.com या संकेतस्थळाला भेट द्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com