Good News : आता शिवाजी विद्यापीठात संस्कृत, पाली अभ्यासक्रम सुरू होणार; व्यवस्थापन मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय

प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र या अधिविभागांना स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Shivaji University
Shivaji Universityesakal
Summary

वृक्ष लागवड करणे, तासिका तत्त्वावर प्राध्यापकांचे मानधन, तसेच विद्यापरिषदेकडे आलेल्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) व्यवस्थापन परिषद या अधिकार मंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये विविध ७५ विषयांवर चर्चा झाली. त्यात विद्यापीठात संस्कृत (Sanskrit language), पाली (Pali) अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र या अधिविभागांना स्वायत्तता देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना, बांधकाम समितीचे कामकाज, विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पीएच.डी.चे नवीन रेगुलेशन्स, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन, प्रकल्पावरील संशोधन सहायकांना रजा देणे.

Shivaji University
Devendra Fadnavis : कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यात भाजपचाच खासदार हवा; NCP च्या बालेकिल्ल्यातून फडणवीसांचा आदेश

तसेच वृक्ष लागवड करणे, तासिका तत्त्वावर प्राध्यापकांचे मानधन, तसेच विद्यापरिषदेकडे आलेल्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. विद्यापीठ कॅम्पस ले-आउट तयार करणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार थकबाकी अदा करणे.

Shivaji University
Devendra Fadnavis : कोणत्याही परिस्थितीत साताऱ्यात भाजपचाच खासदार हवा; NCP च्या बालेकिल्ल्यातून फडणवीसांचा आदेश

त्याचबरोबर स्कूल ऑफ फाईन आर्टस्‌ची स्थापना करण्याबाबत चर्चा झाली. विविध समित्यांचे नामनिर्देशन, हंगामी शिक्षकांची सुमारे २०० पदे भरणे, संत तुकाराम गाथेचे निरुपण या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आदी विषय मंजूर करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com