esakal | परदेशी शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती, पाहा डिटेल्स
sakal

बोलून बातमी शोधा

scholarships from tribal department development for students to study abroad

परदेशात शिक्षणासाठी आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : आदिवासी विकास विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्चशिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने शिष्यवृत्ती दिली जाते. परदेशी विद्यापीठात अनेक नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. याच हेतूने आदिवासी विकास विभागाकडून परदेशातील विद्यापीठात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, अशा दहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आदिवासी विकास विभाग त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार आहे.

परदेशी विद्यापीठांचे जागतिक रँकिंग ३०० पर्यंत आहे, त्याच विद्यापीठात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्तीत आदिवासी विकास विभाग परदेशातील ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे, त्या विद्यापीठास ऑनलाइन प्रणालीद्वारे विद्यापीठाच्या खात्यावर ट्यूशन फी आणि परीक्षा फी जमा करण्यात येणार असून, विद्यार्थ्याचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. निर्वाह भत्त्यामध्ये निवास आणि भोजन खर्चाचा समावेश असेल.

हेही वाचा: दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

अटी काय आहेत?

- विद्यार्थ्याचे वय जास्तीत जास्त ३५ असावे
- नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा ४० वर्ष
- ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख
- परदेशी उच्च शिक्षणासाठी टोफेल आयईएलटीएस प्रवेश परीक्षा
- भूमिहीन आदिवासी, दुर्गम आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य


विमानप्रवास खर्च, व्हिसा फी, स्थानिक प्रवासभत्ता, विमा आणि संगणक अथवा लॅपटॉप यांचा खर्च विद्यार्थ्याने स्वतः करावयाचा आहे. पात्र इच्छुकांनी शिष्यवृत्तीसाठी तत्काळ अर्ज करावेत.
- हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

हेही वाचा: 12 हजारांत 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा असलेले स्मार्टफोन, पाहा यादी

loading image
go to top