esakal | कोणत्या राज्यात कधी सुरु होणार शाळा? पाहा संपूर्ण यादी
sakal

बोलून बातमी शोधा

कोणत्या राज्यात कधी सुरु होणार शाळा? पाहा संपूर्ण यादी

कोणत्या राज्यात कधी सुरु होणार शाळा? पाहा संपूर्ण यादी

sakal_logo
By
नामदेव कुंभार

School Reopening : कोरोना महामारीची दुसरी लाट हळू-हळू ओसरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे जनजीवन पुर्वपदावर येत आहे. नोकरी-व्यावसाय सुरळीत सुरु झाल्यानंतर आता शाळा सुरु करण्याबाबत चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 मार्च 2020 रोजी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केला होता. तेव्हापासून शाळा-कॉलेज बंद आहेत. दीड वर्षानंतर पुन्हा एकदा शाळा आणि कॉलेज सुरु होणार आहेत. मागील दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण आणि परीक्षा सुरु होत्या. जानेवारी 2021 मध्ये काही राज्यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु केल्या होत्या. पण मार्च-एप्रिलमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्याता आला होता. आता कोरोना महामारीची दुसरी लाट जवळपास ओसरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याबाबत हलचाली सुरु झाल्या आहेत. पाहूयात कोणत्या राज्यातील शाळा केव्हापासून सुरु होणार आहेत...

महाराष्ट्र -

कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवीन जीआर जारी केला आहे. यामध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्या समितीच्या निर्णयानुसार शाळा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जे गाव महिनाभरापूर्वी कोरोना मुक्त झाले अशा गावात आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, वर्ग सुरू केले जाणार आहेत

उत्तर प्रदेश -

प्रशासकीय कामासाठी एक जुलैपासून शाळा उघडण्यात आल्या आहेत. मात्र, विद्यार्थांना अद्याप शाळेत बोलवण्यात आलं नाही. सध्या ऑनलाइन वर्ग सुरु आहेत. शिक्षकांना शाळेत बोलवण्याचा निर्णय योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. परिस्थिती पाहून विद्यार्थांना शाळेत बोलण्याचा निर्णय घेतला जाईल.

हेही वाचा: राणेंना मंत्रिमंडळात स्थान; शिवसेनेनं दिलं थेट आव्हान

बिहार-

शाळा पुन्हा सुरु करण्याबाबात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, "विद्यापीठे महाविद्यालय, विविध शिक्षण संस्था, सरकारी प्रशिक्षण संस्थ आणि अकरावी, बारावीपर्यंतचं शिक्षण 50 टक्केंच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरु होणार आहे.

तेलंगाणा-

येथील काही शाळा एक जुलैपासून सुरु करण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेश-

एक जुलैपासून शाळा सुरु होणार होत्या, मात्र 28 जून रोजी हा निर्णय मागे घेण्यात आला. पुढील काही दिवस ऑनलाइन शाळा सुरु ठेवाव्यात असं सांगण्यात आलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वातील सरकारने केंद्रासोबत चर्चा केल्यानंतर शाळाबाबत निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: राज्यात चार दिवस मुसळधार पाऊस; कोकणात अतिवृष्टीचा इशारा

गुजरात -

शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंह चुडासमा म्हणाले की, राज्य सरकारच्या उच्च स्तरीय बैठकीत निर्णय झाल्यानंतरच पुन्हा शाळा सुरु केल्या जातील.

उत्तराखंड -

एक जुलैपासून उत्तराखंडमध्ये ऑनलाइन शाळा पुन्हा सुरु झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग पुन्हा सुरु झाले आहेत. शाळाचे दरवाजे कधी उघडणार याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

loading image