esakal | "एसएससी'ने जारी केली "या' उमेदवारांसाठी ऍन्सर की ! चेक करण्यासाठी "ही' आहे थेट लिंक

बोलून बातमी शोधा

SSC
"एसएससी'ने जारी केली "या' उमेदवारांसाठी ऍन्सर की ! चेक करण्यासाठी "ही' आहे थेट लिंक
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : एसएससी कर्मचारी निवड आयोगा (स्टाफ सिलेक्‍शन कमिशन) कडून फेज - 8 पदवीपूर्व, उच्च माध्यमिक व मॅट्रिकसाठी देशभरातील परीक्षा केंद्रांवर 6, 9 आणि 10 नोव्हेंबर 2020 रोजी आणि बिहार राज्य परीक्षा केंद्रांवर 14 डिसेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल 12 एप्रिल रोजी जाहीर झाला.

बुधवारी 28 एप्रिल रोजी निवड फेज- 8 पदवीपूर्व, उच्च माध्यमिक व मॅट्रिक परीक्षेसाठी ऍन्सर की जाहीर करण्यात आली. "एसएससी'च्या अधिकृत वेबसाइट https://ssc.nic.in/ वर ऍन्सर की उपलब्ध असून 26 मे पर्यंत तपासू शकता.

हेही वाचा: विद्यापीठे व महाविद्यालयांच्या आगामी परीक्षा व प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्याची होतेय तयारी

जाहीर झालेला निकाल पाहता, जवळपास 2 लाख 55 हजार 872 उमेदवारांनी मॅट्रिक्‍स पोस्टसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 3 हजार 426 उमेदवार पात्र झाले आहेत. उच्च माध्यमिकसाठी 2 लाख 41 हजार 415 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 2684 पात्र ठरले. 3 लाख 26 हजार 884 उमेदवारांनी पदवीसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 13 हजार 479 उमेदवार पात्र ठरले आहेत.

उमेदवार आपल्या अंतिम ऍन्सर की बरोबर रोल नंबर आणि पासवर्ड लॉग इन करून आपली प्रश्नपत्रिका तपासू शकतात. ही सुविधा 26 मे 2021 रोजी (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) उमेदवारांसाठी उपलब्ध असेल.