esakal | सीए फाउंडेशन परीक्षार्थींना दिलासा ! बारावी ऍडमिट कार्ड, ऑनलाइन फॉर्मसाठी जरुरी नाही अटेस्टेड

बोलून बातमी शोधा

Exam
सीए फाउंडेशन परीक्षार्थींना दिलासा ! बारावी ऍडमिट कार्ड, ऑनलाइन फॉर्मसाठी जरुरी नाही अटेस्टेड
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोव्हिड-19 मुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळे "दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडिया'ने (आयसीएआय) चार्टर्ड अकाउंटंट्‌सच्या विद्यार्थ्यांकरिता जून 2021 मध्ये आयोजित परीक्षेसाठी फॉर्म भरण्यात येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढला आहे. आयसीएआयने सीए फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या परीक्षांसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आवश्‍यक असलेल्या 12 वी प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) आणि अर्ज / डिक्‍लेरेशन फॉर्म अटेस्टेड करण्याच्या आवश्‍यकतेला शिथिलता जाहीर केली आहे.

ऍडमिट कार्ड नंतर जमा करता येईल

आयसीएआयने सोमवारी, 26 एप्रिल 2021 रोजी जाहीर केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणेनुसार, कोव्हिड-19 महामारीमुळे विविध केंद्रीय व राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रवेशपत्रे मिळाली नाहीत, त्यांना ऍडमिट कार्ड जारी झाल्यानंतर व परिस्थिती सामान्य झाल्यानंतर संस्थेच्या पत्त्यावर पाठवता येतील. तसेच, विद्यार्थी आपल्या बारावी प्रवेशपत्राच्या प्रतीवर सीए फाउंडेशन परीक्षा नोंदणी क्रमांक लिहू शकतात आणि ते foundation_examhelpline@icai.in या ई- मेल आयडीवर मेल करू शकतात.

हेही वाचा: ATMA 2021 मे सेशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू ! "ही' आहे शेवटची तारीख

परीक्षा फॉर्म अटेस्टेड जरुरी नाही

सीए फाउंडेशन परीक्षा 2021 फॉर्म भरण्यासाठी आवश्‍यक असलेल्या 12 वी प्रवेशपत्र नियमात शिथिलता देण्याबरोबरच आयसीएआयने सध्या विद्यार्थ्यांना सीए सदस्य किंवा राजपत्रित अधिकारी किंवा शैक्षणिक संस्थेचे प्रमुख यांच्याकडून परीक्षा फॉर्म अटेस्टेड करण्याच्या नियमातून सूट दिली आहे. कोव्हिड- 19 च्या प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म अटेस्ट करण्यास असमर्थ असल्यास किंवा फोटो किंवा हस्ताक्षर सिस्टीममध्ये नसल्यास फॉर्म भरण्याच्या वेळी आधार कार्ड प्रत अपलोड करून अर्ज सादर करू शकता. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर संस्थेच्या पत्त्यावर पाठविले जाऊ शकते. तसेच आपला सीए फाउंडेशन परीक्षा नोंदणी क्रमांक लिहून आपण ते foundation_examhelpline@icai.in या ई-मेल आयडीवर मेल देखील करू शकता.