esakal | कोरोनामुळे एमटीएस टियर 1 सीबीटी परीक्षा स्थगित ! 'डीआरडीओ'ची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

DRDO

कोरोनामुळे एमटीएस टियर 1 सीबीटी परीक्षा स्थगित ! 'डीआरडीओ'ची घोषणा

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओने मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) भरती प्रक्रियेचा भाग म्हणून पहिल्या टप्प्यातील परीक्षा पुढे ढकलली आहे.

डीआरडीओमार्फत 1817 एमटीएस (जाहिरात क्र. 2019-20/ एमटीएस) भरतीसाठी संगणक आधारित परीक्षेचा (सीबीटी) पहिला टप्पा देशभरातील 42 शहरांमध्ये घेण्यात येणार होता. तथापि, देशभरात वाढत्या कोरोना साथीच्या दुसऱ्या टप्प्याला रोखण्यासाठी विविध राज्यांमध्ये लॉकडाउन केला जात आहे. त्यामुळे डीआरडीओच्या सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (सीईपीटीएम) ने परीक्षा स्थगितीची घोषणा केली आहे. सीईपीटीएमने एमटीएस टियर 1 परीक्षा पुढे ढकलण्याशी संबंधित अपडेट अधिकृत संकेतस्थळ drdo.gov.in वर जाहीर केले आहेत.

हेही वाचा: आयडीबीआय बॅंक भरणार मुख्य डेटा ऑफिसरसह विविध पदे ! जाणून घ्या सविस्तर

अधिकृत वेबसाइटवर नवीन परीक्षेची तारीख आणि इतर अपडेट्‌स

डीआरडीएद्वारे स्थगिती सूचनेनुसार, सरकारच्या कोव्हिड-19 संबंधित परिस्थिती व सूचनांनुसार एमटीएस टियर 1 (सीबीटी) परीक्षेची नवीन तारीख योग्य वेळी जाहीर केली जाईल. दरम्यान, केंद्राने मल्टी-टास्किंग स्टाफ भरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना परीक्षेशी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी वेळोवेळी अधिकृत वेबसाइट drdo.gov.in चेक करण्याचे आवाहन केले आहे.

डीआरडीओकडून मल्टी- टास्किंग स्टाफच्या 1817 पदांसाठी दहावी पास किंवा आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अर्ज प्रक्रिया 23 डिसेंबर 2019 पासून सुरू झाली आणि 23 जानेवारी 2020 पर्यंत चालली.

डीआरडीओ सेप्टम एमटीएस भरती 2019-20 च्या निवड प्रक्रियेनुसार पहिल्या टप्प्यातील टियर 1 सीबीटी परीक्षा टियर 2 टप्प्यासाठी घेण्यात येणार आहे. टियर 2 हा संगणक बेस असेल आणि निवड प्रक्रियेची शेवटची पायरी असेल.

loading image